आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून शिवसेनेचा देवी जागर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- वाढवलेला भरमसाठ कर कमी करण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेवक तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी महापालिका कार्यालयासमोर १९ ऑगस्टला देवीचा जागर घालून सत्ताधाऱ्यांना सद््बुद्धी मिळण्यासाठी प्रार्थना केली. जागराला प्रारंभ होतानाच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांसोबत वादही झाला. सुदैवाने हा वाद मिटला. 

सत्ताधाऱ्यांनी उत्पन्न वाढवण्यासाठी मालमत्ता करात भरमसाठ वाढ केली. वाढीस झालेला विरोध लक्षात घेऊन सत्ताधारी गटाने मालमत्ता करात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. या अनुषंगानेच १९ ऑगस्टला महासभा बोलावली होती. या सभेच्या पूर्वसंध्येवर भारिप-बमसंने १८ ऑगस्टला महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, ठरावाचे सूचक, अनुमोदक यांना त्यांच्या निवासस्थानी जावून घेराव घातला. तर कॉग्रेसने महापालिका कार्यालयात थाळी वाजवा आंदोलन केले. तर शिवसेनेने सभेच्या दिवशी १९ ऑगस्टला सभा सुरु होण्यापूर्वीच देवीच्या जागराचा कार्यक्रम केला. शिवसेनेेने देवीचा जागर घालणाऱ्या गोंधळींना पाचारण करुन सकाळी दहा वाजता जागर सुरु केला. या गोंधळातून इश्वराने सत्ताधारी गटाला कर कमी करण्याची बुद्धी मिळो, अशी प्रार्थना केली. या दरम्यान महापालिकेत सभेसाठी दाखल होणाऱ्या पदाधिकाऱ्यांना शिवसेनेच्या नगरसेवकांनी अडवून कर कमी करण्याची मागणी केली. महापौर विजय अग्रवाल यांचे वाहनही अडवण्यात आले. त्यानंतर आलेल्या स्थायी समिती सभापती बाळ टाले यांचे वाहन अडवण्यात आले. शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा यांनी बाळ टाले यांना गाडीचा काच खाली करण्याची विनंती केली. मात्र बाळ टाले यांनी नकार दिल्याने या दोघांमध्ये वाद झाला. सभापती बाळ टाले गाडीच्या खाली उतरल्याने वाद चिघळला. या दोघांमध्ये चांगलीच बोलाचाल झाली. त्यामुळे काही वेळ वातावरण तंग झाले होते. अखेर इतर नगरसेवकांनी मध्यस्थी केल्याने हा वाद मिटला. सभा सुरु झाल्या नंतर काही तास हा जागर सुरु होता. 
बातम्या आणखी आहेत...