Home »Maharashtra »Vidarva »Akola» Jailbharo Andolan Of Anganwadi Employees

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे बुलडाण्यामध्ये ‘जेलभरो’, 26 दिवसांपासून संप सुरूच

प्रतिनिधी | Oct 06, 2017, 10:17 AM IST

  • अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे बुलडाण्यामध्ये ‘जेलभरो’, 26 दिवसांपासून संप सुरूच
बुलडाणा -आपल्या विविध मागण्यासाठी मागील २६ दिवसांपासून संपावर असलेल्या अंगणवाडी सेविका मदतनिसांच्या मागण्यांकडे सरकार लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ आज ऑक्टोबर रोजी बुलडाण्यात सिटूच्या नेतृत्वात अंगणवाडी सेविका मदतनिसांनी रास्ता रोको जेल भरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाभरातून शेकडो अंगणवाडी सेविका मदतनीस सहभागी झाल्या होत्या. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून नंतर त्यांची सुटका करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या ज्येष्ठ सभासद कुसुम चहाकर जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांनी केले.
आंदोलनामध्ये सचिव सरला मिश्रा, कोषाध्यक्ष जयश्री क्षीरसागर, उपाध्यक्ष मंदा डोंगरदिवे, सहसचिव माया वाघ, बेबी दाते, गोदावरी जाधव, सुवर्णा लाटे, प्रतिभा वक्ते, सुवर्णा पाटील, वर्षा शिंगणे, पुष्पलता खरात, पुंजाबाई चोपडे, अश्विनी सपकाळ, सुलोचना पाटील, सविता चोपडे, संगीता मादनकर, विजया राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका मदतनीस सहभागी झाल्या होत्या. शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील जाधव यांच्या नेतृत्वात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.
अंगणवाडी सेविका मदतनिसांच्या मानधनात वाढ करून त्यांना कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, पगारी सुटी मंजूर करण्यात यावी, यासह इतर मागण्यासाठी अंगणवाडी सेविका मदतनिसांनी मागील सव्वीस दिवसापासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. परंतु शासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही. मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने आज आंदोलन केले.
अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला पाठिंबा
दरम्यान, अंगणवाडी सेविका मदतनिसांच्या या जेल भरो आंदोलनाला महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने आपला पाठिंबा घोषित केला. संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप हिवाळे यांनी पोलिस मुख्यालयात अटक करण्यात आलेल्या अंगणवाडी सेविका मदतनिसांना जाऊन त्यांना संघटनेचा पाठिंबा असल्याचे सांगितले. या वेळी जिल्हा परिषद सदस्या तथा प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस अॅड. जयश्रीताई शेळके यांनीही पाठिंबा व्यक्त केला.

Next Article

Recommended