आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मोत्सवासाठी जिजाऊनगरी सज्ज, हजारो भक्त येणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंदखेडराजा : राष्ट्रमाताजिजाऊ माँ साहेबांचा जन्मोत्सव सोहळा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात १२ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. देश- विदेशातून या जन्मोत्सव सोहळ्यासाठी येणाऱ्या जिजाऊ भक्तांच्या सोयीसाठी जिजाऊ सृष्टीवर मराठा सेवा संघाच्या वतीने पूर्ण तयारी अंतीम टप्प्यात आहे.तर शहरात रस्ते, स्वच्छता, पाणी, लाईट पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून जिजाऊ नगरी जन्मोत्सवासाठी सज्ज आहे. 
 
यावर्षी १२ जानेवारीलाच पौष पौर्णिमा येत असल्याने या महोत्सवाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. जिजाऊ जन्मोत्सव सोहळा हा पौष पौर्णिमेला साजरा करण्यात येत होता. परंतु माँ साहेबांच्या जन्मतिथीनुसार पौष पौर्णिमेला जन्म झाला तर तारखेनुसार १२ जानेवारीला जन्मोत्सव शासनाच्या वतीने ठरवण्यात आला.
 
तेव्हापासून १२ जानेवारीला तारखेनुसार जन्मोत्सव साजरा होत आहे शिवसेना तसेच स्थानिक नागरिकांच्या वतीने तिथीनुसार पौष पौर्णिमेला जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. परंतू यावर्षी तारीख तिथी एकच आल्याने या महोत्सवाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. 

जिजामाता जन्मस्थळी स्वच्छतेचे काम तसेच रंगरंगोटी झाली आहे. राजवाड्यासमोरील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम न.प. च्या वतीने युद्धपातळीवर सुरू झाले आहे. तसेच राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यावर विद्युत रोषनाई पुरातत्व विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
 
तर नगरपरिषदेने जिजाऊ जन्माच्या पूर्वसंध्येला ११ जानेवारी रोजी ही रात्र शाहिरांची भव्य पोवाड्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन सावता महाराज मंदिराच्या भव्य प्रांगणात केले. यामध्ये शाहिराचे संच रात्र शाहीराची गाजवणार आहे १२ जानेवारी रोजी सकाळी सूर्योदयासमयी मंगलमय वातारणात सूरसमयीच्या निनादान ७.३० वाजेला जिजामाता जन्मस्थळी महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे. जिजाऊ नगरी जन्मोत्सवासाठी सज्ज झाली आहे.
 
या उत्सवासाठी लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे अावाहन नगराध्यक्ष अॅड. नाझेर काझी, उपाध्यक्ष सिमाताई शेवाळे यांनी केले आहे. 

१२ जानेवारी रोजी सिंदखेडराजा नगरीमध्ये राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्म झाला होता. राजे लघुजीराजे जाधव यांच्या घराण्यामध्ये जन्मलेल्या माँ जिजाऊंच्या दर्शनासाठी दरवर्षी हजारो जिजाऊभक्त सिंदखेडराजा नगरीमध्ये येत असतात. 

यावर्षी १२ जानेवारी राेजी संपन्न होणारा जिजाऊ जन्मोत्सव हा ४१९ वा जन्मोत्सव सोहळा आहे. सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रासह देश जागतिक स्थरावरील जिजाऊ भक्त सहभागी होणार आहे. आतापर्यंतच्या गर्दीचे उच्चांक मोडल्या जाणारा हा जन्मोत्सव सोहळा असणार आहे.
 
त्यासाठी मातृतिर्थनगरी, राजे लखुजीराव जाधव यांच्या राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ जिजाऊ सृष्टी शिवधर्मपिठ येथे रोषनाई करण्यात आली आहे. यामध्ये साहित्य बुकस्टॉलचे पाचशेच्यावर दोनशेच्यावर भोजनाचे स्टॉल लावण्यात आले आहे.
 
जिजाऊ सावित्री दशरात्रोत्सव सोहळ्यानिमित्त गेल्या जानेवारीपासून ११ जानेवारी पर्यंत शाळा महाविद्यालयामधील विद्यार्थी-विद्यार्थिनींचे सांस्कृतिक भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तरी या उत्सवामध्ये सहभागी होण्याचे आवाहन एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राष्ट्रमाता राजामाता जिजाऊ माँ साहेबांचे जन्मस्थान सिदंखेडराजा याठिकाणी नगर परिषदेच्या वतीने दरवर्षी १२ जानेवारी रोजी जन्मोत्सव सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. याहीवर्षी ११ १२ जानेवारी रोजी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे अायोजन शहरात करण्यात आले आहे.
 
या आयोजनाअंतर्गत ११ जानेवारी रोजी ही रात्र शाहीरांची हा कार्यक्रम १२ जानेवारी रोजी महापूजेचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्यमंत्री खासदार, आमदार यांना निमंत्रित करण्यात आले आहे. सध्या अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे.
 
या परिस्थितीत हा सोहळा साजरा करण्यासाठी आचारसंहितेची अडचण आहे किंवा कसे असल्यास देशातील तमाम शिवभक्त जिजाऊ भक्तांच्या धार्मिक भावना अस्मितेचा प्रश्न ही बाब विचारात घेऊन सोहळा साजरा करण्याची परवानगी तात्काळ द्यावी अशा आशयाचे निवेदन अॅड. नाझेर काझी यांनी जिल्हाधिकारी, आयुक्त अमरावती, विभागीय आयुक्त तसेच राज्य निवडणूक आयोग मुंबई यांना पाठविले आहे. त्यानिमित्ताने जिजाऊ जन्मोत्सवाच्या शुभेच्छा जाहीरातीवरसुद्धा गदा आली आहे.