आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जावेद इनामदारचा जामीन नाकारला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - लाच घेताना पकडण्यात आलेला उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इनामदार याचा जामीन नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा न्यायालयाने फेटाळला आहे. आज त्याने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.

गृहकर्ज मिळण्यासाठी तेल्हारा पंचायत समितीच्या दोन कर्मचाऱ्याकडून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इनामदार याने २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. पंचवीस हजार रुपयांपैकी पंधरा हजार जुलै महिन्यात दिल्यानंतरही कर्मचाऱ्यांना त्रास दिला जात होता.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ही फाइल परत उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इनामदार याच्याकडे गेली. फाइलवर सही करतो पण उर्वरित १० हजार रुपये लागतील, असा आग्रह इनामदार याने धरत हस्तकामार्फत निरोप दिला होता. १९ ऑक्टोबर रोजी इनामदार याने कार्यालयातच १० हजार रुपये घेऊन खिशात टाकले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सभेस जाताना इनामदारांना एसीबीचे पोलिस उपअधीक्षक उत्तमराव जाधव यांनी रंगेहात पकडले होते. न्यायालयात हजर केले असता, ३० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली होती. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश तांबी यांनी परत त्यांना जामीन नाकारला आहे. इनामदार यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी १५ दिवसांची वाढ होण्याची शक्यता आहे.