आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षभरात दहा हजार रुग्णांनी घेतला जीवनदायी योजनेचा लाभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकोला जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यातील गरजू ९,१२३ रुग्णांनी जीवनदायीचा लाभ चालू वर्षात घेतला आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेवर १७ कोटी ८० लाख ५८ हजार ७४० रुपये खर्चातून शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, सर्वसामान्यांना नवसंजीवनी देणारी ही महत्त्वाकांक्षी योजना ठरली आहे.
राजीव गांधी आरोग्य योजना ही एक आरोग्य विमा योजना आहे. या योजनेंतर्गत ९७१ गंभीर शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयात मोफत उपचार केले जातात. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्णपणे पेपरलेस योजना असलेली ही एकमेव योजना ठरली आहे. रुग्णालय अंगीकृत करणे असो वा रुग्ण नोंदणी ते रुग्ण डिस्चार्ज, ऑनलाइन प्रॉ ऑथ या सर्व बाबी वेब अॅप्लिकेशनद्वारे कार्यान्वित आहेत. ज्यामुळे कोणताही अंगीकृत रुग्णालयातील रुग्णांची वैयक्तिक स्वरूपात देखरेख केली जाते. यामुळे योजनेला स्टेट ई-गव्हर्नन्स सिल्व्हर अवॉर्ड २०१३ तसेच इंडियाज बेस्ट गव्हर्नन्स प्रोजेक्ट २०१४ मधील स्कॉच अवॉर्डही मिळाले आहेत. आरोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. एच. गिरी, सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. नितीन अंबाडेकर यांच्या मार्गदर्शनात या योजनेची जनजागृती व्यापक प्रमाणात करण्यात आली. त्यामुळे योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली. जिल्ह्यातील एकूण ५७६६ रुग्णांनी नोव्हेंबरपर्यंत लाभ घेतल्याची नोंद आहे. याशिवाय शेजारच्या जिल्ह्यातील रुग्णांनीसुद्धा लाभ घेतला असून, एकूण ९,१२३ केसेस निकाली काढण्यात याेजनेंतर्गत यश प्राप्त झाले आहे.

सर्वोपचारस्त्री रुग्णालयाला आर्थिक लाभ : शासकीयवैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे ९२७ केसेस निकाली काढण्यात आल्या. या मोबदल्यात १,२३,६२,७०० रुपये महसूल जिल्हा स्त्री रुग्णालयात ६० केसेेस निकाली काढण्यात आल्या असून, ५,७५,००० रुपये महसूल सरकारी यंत्रणेच्या आरोग्य संस्थांना प्राप्त झाला आहे.

दाेनवर्षांत ९० शिबिरे : मागीलदोन वर्षांत ९० पेक्षा जास्त शिबिरे घेण्यात आली आहेत. प्रामुख्याने ही आरोग्य शिबिरे अति दुर्गम ग्रामीण भागात घेण्यात आली. अंगीकृत रुग्णालयामध्ये प्राथमिक तपासणी करून पुढील उपचार शस्त्रक्रिया तज्ज्ञांमार्फत पुरवण्यात आल्या आहेत.

आजार निहाय लाभ
कॅन्सररुग्ण ३१२६
अपघातग्रस्त रुग्ण १६६२
कान,नाक, घसा १५२९
विशेष शस्त्रक्रिया ४९७३

बातम्या आणखी आहेत...