आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेळा लाखांचे दागिने तक्रारदारांना दिले परत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - चोरीझाल्यानंतर चाेरीस गेलेला ऐवज परत मिळण्याची आशा धूसर असते. चोर-पोलिसांचा खेळ सर्वांना परिचित असल्यामुळे तशी आशाही कोणी करत नाही. मात्र, खदान पोलिसांनी चोर-पोलिसांच्या खेळाला छेद दिला आहे.

त्यांनी जबरी चोरीच्या १२ घटनांचा तपास लावला असून, चोरी गेलेले १६ लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांकडून वसूल केली. दरम्यान, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक पोलिस उपअधीक्षक प्रदीप चव्हाण यांच्या हस्ते संबंधित १२ तक्रारकर्त्यांना त्यांचा ऐवज सत्कार करून परत देण्यात आला. तपासकामासंदर्भात जिल्ह्यात खदान पोलिस ठाणे अव्वल ठरले अाहे. खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरी, घरफोडी, लुटमार आणि महिलांचे मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणांचा तपास लावण्यात खदान पोलिसांना यश आले आहे.

याअनुषंगाने खदान पोलिस ठाण्याचे ठाणेदार छगनराव इंगळे यांच्या तपासकार्याबद्दल शुक्रवार, जानेवारी रोजी जिल्हा पोलिस मुख्यालयात गौरव करण्यात आला.
या वेळी विविध ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनांमधील तक्रारदारांना चोरट्यांकडून जप्त करण्यात आलेला त्यांचा ऐवज परत देण्यात आला. यामध्ये मााधवनगरातील प्रल्हाद शेगावकर यांना सोन्याचे डोरले आणि लॉकेट असा १६ हजार ८३५ रुपयांचा ऐवज परत देण्यात आला. जिल्हा परिषद कॉलनीतील अोंकार ठाकरे यांना एक लाख ३१ हजार रुपयांचे दागिने, कीर्तीनगरातील निकिता दडवी यांचे ९० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र, नानकवाडीतील लता धर्मेंद्र आनंदानी यांनाी ३२ हजार ५०० रुपयांचे मंगळसूत्र परत देण्यात आले. आकृतीनगर येथील उषा विनय पोरे यांना ३६ हजार रुपयांचे दागिने, गायत्रीनगरातील गजानन हरिभाऊ नेरकर यांना ४७ हजार रुपयांचे दागिने परत देण्यात आले. योगेश पंजाबराव वडाळ यांना सोन्याचे दागिने मोबाइल असा ३१ हजार ३८५ रुपयांचा ऐवज, मलकापूर येथील देवीदास सुगदेव पाचपोर यांना ४२ हजार ४३० रुपयांचे दागिने परत देण्यात आले. बालाजीनगरातील व्यापारी धर्मेंद्र बलरामदास गुरबानी यांच्यावर १३ जणांनी हल्ला करून ११ लाख रुपये लुटले होते. त्यात पोलिसांनी चेतन मारोतीराव डिवरे याला अटक करून १० लाख ३० हजार ९४० रुपये जप्त केले होते. ही रक्कम परत देण्यात आली. विनोद झटाले यांना २२ हजार ४८५ रुपयांचे दागिने परत करण्यात आले. सहकारनगरातील गोविंदराव कुनघाडकर यांना ४९ हजार ५०० रुपयांचा ऐवज, रमेश देशमुख यांनाही चोरट्यांकडून जप्त केलेली रक्कम परत देण्यात आली.

पोलिसांचे कौतुक
पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा उपअधीक्षक प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनात या गुन्ह्यांचा तपास लावण्यात आला. दरम्यान, या कार्यक्रमात खदान पोलिसांचे कौतुक करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानंतर तपासात निष्पन्न झालेल्या तक्रारदारांना त्यांचे दागिने या वेळी परत देण्यात आले.