आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीसूर्या घोटाळ्यातील जोशीला जमानत नाहीच, गुंतवणूकदारांची केली कोट्यवधीने फसवणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- गुंतवणूकदारांना दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट कंपनीचे संचालक समीर जोशी याने न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. ती याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.
श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या संचालकांनी अनेकांना आमिष देऊन त्यांच्याकडून ठेवी घेतल्या. मात्र, कालावधी पूर्ण झाल्यानंतर रक्कम परत देण्यास टाळाटाळ केल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले होते. त्यानंतर त्यांनी खदान, रामदासपेठ पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या होत्या. त्यावरून श्रीसूर्याचे संचालक समीर सुधीर जोशी, पल्लवी समीर जोशी, मोहन मुकुंद पितळे, मुकुंद अंबादास पितळे, विकास दीक्षित, वर्षा विकास दीक्षित यांच्याविरुद्ध खदान पोलिस ठाण्यात डिसेंबर २०१३ रोजी गुन्हा दाखल केला होता. या आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. आरोपींपैकी समीर सुधीर जोशी याने जिल्हा सत्र प्रथम श्रेणी न्यायाधीश व्ही. एन. तांबी यांच्या न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
त्यावर सुनावणीदरम्यान सरकारी वकील परवेज ढोकडिया यांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपीने मिलिभगत करून २००७ पासून २०१३ पर्यंत विदर्भातील सर्व जिल्ह्यांत सेमिनार घेऊन गुंतवणूकदारांना रक्कम दामदुप्पट देण्याचे आमिष दाखवले. त्यावरून अनेकांनी लाखो रुपये श्री सूर्या इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये गुंतवले. त्यानंतर मुदतीत रक्कम देण्यास कंपनीने हात वर केले. त्यामुळे या आरोपीला जामीन देण्यात येऊ नये. आरोपी आणि सरकार पक्षाची बाजू ऐकून समीर जोशी याची याचिका न्यायालयाने खारीज केली.
बातम्या आणखी आहेत...