आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरट्यासह सराफाला केली अटक, पाच दिवसांत पकडले आरोपी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - स्थानिक गुन्हे शाखेने पाच दिवसांत पत्रकार कॉलनीतील चोरी प्रकरणातील गुन्ह्याचा छडा लावला आहे. एका चोरट्यासह पोलिसांनी एका सराफा व्यावसायिकाला अटक केली. त्यांच्याकडून ९० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.
रंजनकुमार आनंदराव आंधळे यांच्या घरात चोरट्यांनी सोमवारच्या रात्री चोरी केली होती. त्यांनी ४४ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह अर्धा किलोच्या वर चांदी लंपास केली हाेती. स्थानिक गुन्हे शाखेकडे या घटनेचा तपास गेला असता पोलिस निरीक्षक जितेंद्र सोनोने यांच्या नेतृत्वात पोलिसांनी शुक्रवारी जर्नादन पांडुरंग जाधव याला कोडठी बाजारातून ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली. एका साथीदाराच्या मदतीने त्याने चोरी केली होती. त्याने सोन्या-चांदीचे चोरलेले दागिने लोठिया ज्वेलर्समध्ये विकले होते. त्यावरून पोलिसांनी ज्वेलर्सचे मालक राजेंद्र वसंतराव तारापुरे याची चौकशी केली असता पोलिसांनी त्याच्याकडून ९० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहे. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. स्थानिकगुन्हे शाखेचे यश : स्थानिकगुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाच दिवसांत आरोपी पकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपी हा सराईत असल्यामुळे त्यानेच चोरी केली असावी म्हणून पोलिस त्याच्या मागावर होते. शुक्रवारी तो कोठडी बाजारात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी जनार्दन पांडुरंग जाधव याला अटक केली, तर त्याच्या सोबत्याला पोलिसांची चाहूल लागताच तो पळून गेला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख जितेंद्र सोनोने, पोलिस हेड कॉन्स्टेबल अशोक चाटी, रवी इचे, आशिष ठाकूर, शेख हसन, जय मंडावरे, बाबुसिंग पठ्ठे विजय पाटील यांनी केली.