आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकारांना मिळणार हक्काचा निवारा : संचालक भुजबळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: अकोल्यात संवाद साधताना माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक देवेंद्र भुजबळ (मध्यभागी) या वेळी उपस्थित जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील.
अकोला - ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांच्या गृहनिर्माण सोसायटीचा प्रश्न सोडवण्याचा निर्णय प्राधान्याने घेतला आहे. यासाठी त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या संघटनांकडून सूचना मागितल्या आहेत. मसुदा तयार होऊन पत्रकारांना हक्काचे घर मिळेल,’ असा विश्वास माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक देवेंद्र भुजबळ यांनी व्यक्त केला.

माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक देेवेंद्र भुजबळ हे सोमवारी अकोल्यात आले होते. या वेळी जिल्हा माहिती कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तत्पूर्वी त्यांनी जिल्हा माहिती कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडून मिशन दिलासाची माहिती जाणून घेतली. या वेळी भुजबळ यांनी माहिती कार्यालयाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील कर्मचाऱ्यांचा गौरव केला. अनेक वर्षे पत्रकारिता करत असल्यानंतरही अनेक पत्रकारांना भाड्याच्या घरात आयुष्य खर्ची घालावे लागते. मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या घराचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याशिवाय पेन्शनबाबत तत्त्वत: मान्यता मिळाली आहे. श्रमिक पत्रकार, मालक, संपादक, ज्येष्ठ पत्रकार या चारही घटकांना समाविष्ट करण्याचे विचाराधीन आहे. पत्रकारांनी आरोग्यविषयक सेवा सुविधा, कल्याण निधीचा लाभ घ्यावा. पत्रकारांच्या कार्याचा गौरव व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणाऱ्या पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहनही माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक देेवेंद्र भुजबळ यांनी केले. या वेळी माध्यमांच्या प्रतिनिधींसह जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, सहायक जिल्हा माहिती अधिकारी नितीनकुमार डोंगरे, प्रमोद धोंगडे, कॅमेरामन चंदू पाटील, हबीब शेख, सुनील टोमे, सतीश बगमारे, वर्षा मसने आदी उपस्थित होते.
पत्रकारांसाठी कार्यशाळा : पत्रकारांच्या विविध योजनांबाबत जिल्हास्तरावर पत्रकारांची संयुक्त कार्यशाळा घ्यावी, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना केले आहे. जिल्हा माहिती कार्यालयाने सर्वच स्तरातील पत्रकारांना माहिती पुरवण्यासोबत त्यांना सेवासुविधांचा लाभ कसा देता येईल, यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.