आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय प्रवेशासाठी 5 हजारांची लाच घेताना मुख्याध्यापकासह लिपीक एसीबीच्या जाळ्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कारंजा, वाशीम - शाळेत प्रवेश देण्यासाठी विद्यार्थ्याच्या पालकाकडून 5 हजाराची लाच मागून ती स्विकारताना आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकासह लिपीकास वाशीम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतल्याची घटना आज दि.22 रोजी घडली. या घटनेमुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार कारंजा येथील तक्रारदाराने वाशीम एसीबीकडे दिलेल्या तक्रारीनुसार कारंजा लाड येथील 100 टक्के शासकिय अनुदान प्राप्त एम.बी.आश्रमशाळेत नातवाला इयत्ता 5 वीच्या प्रवेशासाठी गेलो असता शाळेचे हेडमास्तर अरविंद नवलसंगई कस्तुरीवाले व लिपीक सुदीप सुर्यकांत मिश्रीकोटकर यांनी 5 हजार रुपये लाचेची मागणी केली. प्राप्त तक्रारीवरुन वाशीम एसीबीचे पोलीस उपअधीक्षक आर.व्ही.गांगुर्डे यांनी सापळा रचून केलेल्या कारवाईत हेडमास्तर अरविंद कस्तुरीवाले व लिपीक सुदीप मिश्रीकोटकर यांनी तक्रारदाराच्या नातवाला इयत्ता 5 वी मध्ये प्रवेश देण्यासाठी लाचेची मागणी करुन ती पंचासमक्ष स्विकारल्यावरुन लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 चे 7,13 (1)(ड) सहकलम 13 (2) नुसार गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले़ सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात वाशीम एसीबीचे पोलीस उपअधीक्षक आर.व्ही.गांगुर्डे यांच्या पथकाने केली.
बातम्या आणखी आहेत...