आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Khatri Murder Case: Many Barriers Catch Convicts

खत्री हत्या प्रकरण : आरोपी पकडण्यात दमछाक; मॉलच्या भागीदारांची चौकशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - बिल्डर किशोर खत्री यांच्या हत्येप्रकरणी मनसेचे माजी जिल्हाप्रमुख रणजितसिंह चुंगडे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा बुधवारी रात्री दाखल करण्यात आला. दरम्यान, गुरुवारी फोरेन्सिक लॅबच्या टीमने सोमठाणा शिवारातील घटनास्थळावरून माती रक्ताचे नमुने घेतले असून, अमरावती येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

किशोर खत्रींवर मंगळवारी सायंकाळी गोळ्या झाडून चाकूने तोंडावर वार करून हत्या करण्यात आली. घटनेच्या दिवशीच सोमठाणा येथील ग्रामस्थांचे बयाण नोंदवण्यात आले होते. आज घटनेला दोन दिवस उलटले, तरी अद्यापही जुने शहर पोलिसांच्या हाती काहीही ठोस पुरावा लागला नाही. किशोर खत्री यांची हत्या जमिनीच्या वादातूनच झाली असल्याचा सुगावा प्रथमदर्शनी पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे जुने शहर पोलिसांनी तपासाची सर्व चक्रे चित्रा टॉकिजच्या जागेवर होत असलेल्या मॉलकडे वळवली आहेत. या व्यवसायात कोण सहभागी होते याची माहिती पोलिस घेण्याचा प्रयत्न करीत आहे. मध्य प्रदेशात जुने शहर पोलिसांचे पथक रवाना झाले असून, मठांची तपासणी केली जात आहे.

गोळी हरवल्याने तपासात अडथळा : एमएच३० पी. ३०४० क्रमांकाच्या सफारी कारमधून पोलिसांनी दोन पिस्तूल जप्त केल्या आहेत. कदाचित या पिस्तुलाचा तर वापर हत्येसाठी झाला नसावा असा संशय पोलिसांना आहे. किशोर खत्री यांच्या छातीवर दोन ते दीड फुटांच्या अंतरावरून गोळी झाडल्याचे तपासात समोर आले असले, तरी गोळी हरवल्याने तपासात अडथळा निर्माण झाला आहे.

जागा ठरली खुनास कारणीभूत : सिटीकोतवालीमागे काही वर्षांपूर्वी चित्रा टॉकिज होती. या जागेवर शॉपिंग मॉल बांधण्यात येत आहे. यात किशोर खत्री यांची भागीदारी होती. या मॉलचे उद्घाटन लवकरच होणार असून, यावरूनच मुंबईच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये सोमवारी बालाजी ट्रस्टचे रणजितसिंह चुंगडे आणि मॉलची उभारणी करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी खत्री यांची हत्या झाली.

संशयितांची चौकशी, पण अटक मात्र एकही नाही. : दिलीपखत्री यांच्या तक्रारीवरून जुने शहर पोलिसांनी बुधवारी चुंगडे यांच्याविरुद्ध कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी चार जणांना चौकशीसाठी फक्त ताब्यात घेतले.