आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Khatri Murder Case: Police Reached In Madhya Pradesh In Search Of Convicts

खत्री हत्या प्रकरण: आरोपीच्या शोधार्थ पोलिस मध्य प्रदेशात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - इस्टेट ब्रोकर किशोर खत्री यांच्या मंगळवारी झालेल्या हत्येप्रकरणी आरोपीचा शोध घेण्यासाठी अकोला पोलिस मध्य प्रदेशात गेले आहेत. किशोर खत्री यांच्या छातीवर झाडलेली गोळी कोणाच्या कोणत्या बंदुकीतून सुटली, याचा शोध पोलिस घेत आहेत. बंदुकीतून सुटलेली गोळीच खऱ्या आरोपीची ओळख समोर आणण्यासाठी महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे.

शहरातील प्रख्यात बिल्डर तथा इस्टेट ब्रोकर किशोर खत्री यांची मंगळवारी सायंकाळी अकोला तालुक्यातील सोमठाणा शिवारात हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी वेगाने "डॉग स्कॉड'च्या मदतीने रात्रीच चारचाकी वाहनासह रणजितसिंह चुंगडे यांच्या दोन मुलांना संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. सिटी कोतवाली चौकात असलेल्या व्यापारी संकुलाच्या भागीदारीच्या वादातून किशोर खत्री यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी सफारी वाहनातून मंगळवारी रिव्हॉल्व्हर जप्त केल्या आहेत. अतिरिक्त पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक रियाज शेख यांचा तपास वेगाने सुरू आहे. तीन वेगवेगळे पथके तपासकामी तयार करण्यात आले असून, त्यातील दोन पथके मध्य प्रदेशातील हरियाल इंदूर येथील मठांमध्ये आरोपीचा कसून शोध घेत आहेत.
खत्री यांच्यावर अंत्यसंस्कार
शवविच्छेदनानंतर किशोर खत्री यांच्यावर बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी शहरातील सर्वच बांधकाम व्यावसायिक, भाजप, काँग्रेस नेते अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.
मुख्य रस्त्यावर नाकेबंदी
शहरात येणाऱ्या जाणाऱ्या सर्व मुख्य रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली असून, वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. मंगळवारी रात्रभर बुधवारी सकाळपासूनच पोलिसांची पथके तपासकामी जिल्ह्यातील विविध ठिकाणी रवाना झाली होती.
नागरिकांचे नोंदवले बयाण
सोमठाणा शिवारात ही हत्या झाल्याने पोलिस पाटलासह गावातील काही नागरिकांचे पोलिसांनी बयाण नोंदवले आहे. बयाणमध्ये फक्त घटना घडल्याचे आम्हाला माहिती आहे, असा स्पष्ट उल्लेख केला आहे. त्यामुळे पोलिसांना तपास करण्यात मोठी अडचण निर्माण होत आहे.
ते ट्रॅक्टर कुणाचे?
घटनास्थळीपोलिसांना चारचाकी वाहनाचे ठसे आढळून आले. यांतील काही ठसे सफारीचे, तर काही ट्रॅक्टर ट्रॉलीचे दिसून येतात. घटनास्थळी ट्रॅक्टर कसे आले ते कुणाचे, याचाही शोध पोलिस घेत आहेत.

पथक बाहेरगावी रवाना
किशोर खत्री यांच्या मारेकऱ्यांचा आम्ही लवकरच शोध घेऊ. तपासकामी काही पथके बाहेरगावी रवाना केली आहेत. रियाज शेख, ठाणेदार, जुने शहर पोलिस स्टेशन.