आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरण झालेली मनश्री लाकडे 2 महिन्यांनंतर शेगावात आढळली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट - स्थानिक जिजामाता नगरातून २४ जूनला अपहरण झालेली मनश्री लाकडे ही सहा वर्षीय बालिका शेगावमध्ये विमनस्क अवस्थेत फिरताना आढळून आली. एका सलून चालकाच्या प्रसंगावधानाने तिचा शोध लागला असून, अकोट पोलिसांनी तिला अकोट येथे आणले आहे.
मनश्री ही तिच्या राम नावाच्या मित्रासोबत २४ जूनच्या दुपारी घराबाहेर खेळत होती. ते दोघे घराबाहेर खेळत असताना एक ३० ते २५ वर्षीय तरुण महिला तिथे आली. तिने मनश्रीशी संवाद साधत तिला सोबत येण्यासाठी आग्रह केला. हे पाहताच राम सावध झाला. त्याने त्या दोघींचा पाठलाग करणे सुरू केले. हे महिलेच्या लक्षात येतात तिने रामला २५ रुपये देऊन त्याला दुकानातून मोबाईल रिचार्ज व्हावचर चॉकलेट आणण्यास सांगितले. दुकानातून साहित्य आणेपर्यंत महिला मनश्रीला घेऊन पसार झाली होती. रामने ही माहिती मनश्रीच्या घरी देताच एकच गोंधळ उडाला. शहर पोलिसांनी अज्ञात महिलेच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मनश्रीच्या तपासासाठी तीन पोलिस पथके गठित केली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांनीसुद्धा त्यांचे पथक तपासासाठी पाठवले होते. प्रत्यक्षदर्शी रामने केलेल्या वर्णनानुसार अपहरणकर्त्या महिलेचे रेखाचित्र तयार केले होते. मनश्रीच्या उर्वरित.पान
छायाचित्रासहमहिलेचे रेखाचित्र सर्वत्र प्रकाशित केले होते. मात्र, मनश्रीचा तपास लागत नव्हता.

खंडणीची शक्यता नाही : मनश्रीच्यापालकांची आर्थिक स्थिती अत्यंत बेताची असल्याने खंडणीसाठी अपहरण करण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे लहान मुलांचे अपहरण करून त्यांच्याकडून भिक मागणे इतर कामे करणाऱ्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले होते. पोलिसांनी मनश्रीच्या शोधासाठी मध्यप्रदेश, राजस्थान येथेही चौकशी केली.

पालक आनंदी : मनश्रीच्या शोध लागताच पालक आनंदी झालेत. मात्र, तिची झालेली अवस्था पाहताच त्यांच्या काळजात धस्स झाले.

पोलिस सातत्याने मागावर : २४ जूनपासून पोलिस सातत्याने मनश्रीच्या शोधात होते. खबऱ्यांना कामाला लावले होते. नरबळीची शक्यताही तपासली होती. मात्र, ठोस माहिती मिळत नसल्याने पोलिस तपास यशस्वी होत नव्हता.

खेळकर-सोळंकेचीमेहनत : मनश्रीच्याशोधासाठी एएसआय रणजित खेडकर, हेड कॉन्स्टेबल उमेश साेळंके यांनी खुप मेहनत घेतली. सुमारे हजाराच्या वर लोकांशी सतत संपर्कसुद्धा केला. फोटो दाखवून हिस्ट्री शिटर गुन्हेगारांना तपासले. या पाठपुराव्यामुळे घाबरूनच अपहरणकर्त्यांनी मनश्रीला सोडून दिले असावे. या दोघांच्या प्रयत्नांना रिवार्ड मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मनश्रीला अकोटात आणले : अपहृतमनश्रीला उपनिरीक्षक अशोक सूर्यवंशी, पोलिस कॉन्स्टेबल जितेंद्र कातखेडे, पोलिस कॉन्स्टेबल राहुल वाघ, अकोला येथील सायबर क्राइम सेलचे एएसआय रणजित नलावडे यांच्या पथकाने अकोटला आणले.

अखेर मनश्री सापडली : मनश्रीलासप्टेंबरला सकाळी वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने शेगाव रेल्वेस्थानकावर सोडून पळ काढल्याचे मनश्रीने सांगितले. ती तेथे रडत होती. सकाळी गांधी चौक, मोदीनगर येथील एका सलून व्यावसायिकाला मनश्री सतत रडताना दिसून आली. त्याने शेगाव पोलिसांना माहिती दिली. शेगाव पोलिस मनश्रीला घेऊल गेलेत. ती फक्त तिचे नाव मनश्री एवढेच सांगत होती. शेगाव पोलिसांनी बेपत्ता व्यक्तींच्या यादीमध्ये शोध घेतला असता प्रकरणाचा उलगडा झाला.

मनश्रीची प्रकृती खालावली
मनश्रीची प्रकृती खालावली आहे. अपहरण कर्त्याने तिला उपाशी ठेवले असावे. तसेच तिला मारझोडसुद्धा केली आहे. तिच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. अकोटला आणताच रुग्णालयात दाखल केले.

मनश्रीच्या बयाणावर चौकशी
^मनश्रीची प्रकृती सुधारल्यावर तिची चौकशी करू. तिने दिलेल्या माहितीवरून गुन्हेगारांचा शोध घेऊ. मनश्रीवर उपचार सुरू केले आहेत.'' कैलासनागरे, शहर पोलिस निरीक्षक
बातम्या आणखी आहेत...