आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kidney Smuggling: Investigation Fake Documents Maker

किडनी तस्करी: बनावट कागदपत्रे बनवणाऱ्याची चौकशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - किडनी तस्करी प्रकरणात पीडितांचे बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या जुने शहरातील एका जणाला खदान पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले होते. त्याची चौकशी करून त्याचे बयाण घेतल्याची माहिती आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपी सांगली येथील शिवाजी कोळी मेहकर येथील विनोद पवार यांचे जामीन न्यायालयाने नाकारल्याने त्यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.

किडनी तस्करी प्रकरणाचे मुख्य सूत्रधार सांगली येथील शिवाजी कोळी मेहकर येथील विनोद पवार यांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले होते. मात्र, न्यायालयाने त्यांचे जामीन अर्ज नाकारल्यामुळे त्यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे, तर या प्रकरणात पोलिसांनी पीडितांच्या नातेवाइकांचे बँक डिटेल काढले असून, त्याची तपासणी पोलिस करत आहेत, तर पोलिसांनी आरोग्य संचालकांकडे डॉक्टरावर व्होटा कायदा लावण्यासाठी परवानगी मागितली आहे.

मात्र, आतापर्यंत त्याचे उत्तर पोलिसांना आले नाही. त्यामुळे पोलिस किडनी प्रत्यारोपण कायद्याच्या समितीबाबत चौकशी करत आहेत. आतापर्यंत या प्रकरणात सात पीडितांच्या किडन्या काढल्याचे समोर आले आहे, तर यातील डॉक्टर वगळता मुख्य सूत्रधारांना पोलिसांनी अटक केली आहे. किडनी तस्करी प्रकरणात किडन्या देणारे घेणाऱ्यांच्या वैद्यकीय तपासण्यासुद्धा मेडिकल कॉलेजमध्ये केल्या आहेत.