आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानव अवयव तस्करीचा गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - किडनी तस्करी प्रकरणातील आरोपींची पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी संपली होती. त्यामुळे पोलिसांनी शुक्रवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एका आरोपीला न्यायालयीन कोठडी, तर दुसऱ्या आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ केली आहे. पोलिसांनी आपल्याच पोलिस कारवाईत सुधारणा करत मानव अवयव तस्करी प्रकरणाचे कलम ३७० दाखल केले आहे.
अकोल्यातील सहा जणांना व्याजाने पैसे देऊन ते वसूल करण्यासाठी िकडनी विकण्याला भाग पाडणाऱ्या दोन आरोपींविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचे गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी दहा दिवसांपासून पोलिस कोठडीत आहेत. शुक्रवारी या दोन्ही आरोपींची पोलिस कोठडी संपल्यामुळे पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपी पीडितास व्याजाने पैसे देणारा आनंद जाधव याच्या पोलिस कोठडीची मागणी फेटाळली तर दुसरा आरोपी देवेंद्र सिरसाट याच्या पोलिस कोठडीत १५ डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे. या प्रकरणातील जिल्ह्याबाहेरील दोन्ही सूत्रधार विनोद पवार आणि शिवाजी काेळी हेसुद्धा पोलिस कोठडीत आहेत.

डी.व्ही. हरणे यांच्या कोर्टात झाली. सरकारपक्षाच्या वतीने सरकारी वकील विजय पंचोली यांनी तर आरोपींच्या वतीने अॅड. प्रकाश वखरे, अॅड. एम. बी. शर्मा, अॅड. संतोष इंगळे यांनी काम पाहिले.

पोलिसांचा युक्तिवाद असा
पोलिसांनी न्यायालयाला आरोपी आनंद जाधव देवेंद्र सिरसाट यांची १५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. सांगलीचा आरोपी शिवाजी कोळी आणि बुलडाण्याचा आरोपी विनोद पवार यांच्यासोबत बसवून आरोपींची चौकशी करायची आहे. त्यानंतर एकमेकांचा संबंध उघड होणार आहे. याप्रकरणी आम्ही एखाद्या व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध मानवी अवयव काढण्याचे कलम लावले आहे, अशी बाजू पोलिसांनी न्यायालयात मांडली.

आरोपी पक्षाचा युक्तिवाद
पोलिस तपास भरकटवत आहेत. मुळात फसवणुकीचा गुन्हा दाखल असताना पोलिस किडनी तस्करीचा तपास करत आहेत. त्यासाठी दहा दिवसांपासून आरोपी पोलिसांच्या कोठडीत आहेत. त्या वेळी पोलिसांनी सर्व आरोपींना एका ठिकाणी का बसवले नाही? किडनी ट्रान्सफर प्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन अॅक्ट १९९४ हा कायदा असताना पोलिसांनी ३७० जबरदस्ती अवयव काढण्याचे कलम लावले आहे. हे येथे लागू पडत नाही. पीडितांनी स्वत:च्या मर्जीने किडनी दिल्या आहेत, असा युक्तिवाद आरोपी आनंद जाधवचे वकील प्रकाश वखरे यांनी केला. न्यायालयाने हा युक्तिवाद ऐकून आरोपींची रवानगी कारागृहात केली आहे.

पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
पोलिसांनी किडनी तस्करीच्या प्रकरणात सुरुवातीला फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर किडनी काढलेले पीडित आणि ज्यांना किडनी लावली त्यांची वैद्यकीय तपासणी केली. मात्र, किडनी प्रत्यारोपणाचे प्रकरण असताना वेळीच पोलिसांनी किडनी ट्रान्सफर प्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन अॅक्ट १९९४ हा स्वतंत्र कायदा असताना ते कलम लावले नाही. उलट त्यांना उपरती आल्यानंतर त्यांनी कलम ३७० म्हणजे वेठबिगार ठेवून, डांबून ठेवून त्यांचे जबरदस्तीने अवयव काढण्यासाठीचे कलम शुक्रवारी लावले. मात्र, असे असतानाही या प्रकरणात एकाही डॉक्टरला अद्यापही आरोपी बनवले नाही. जर यानंतर पोलिसांनी डॉक्टरांना आरोपी बनवलेच तर सध्या उर्वरित.पान १२
अटकेतअसलेल्या आरोपींची पोलिस कोठडी संपलेली असेल आणि डॉक्टरांना अटक केलेली असेल, त्यामुळे पोलिसांना नेमके या तपासातून काय साध्य करायचे आहे, याविषयी पोलिसच गोंधळलेले असल्याचे दिसून येते. त्यामुळे या प्रकरणात पाेलिसांच्या गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रियेवर आणि तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
बातम्या आणखी आहेत...