आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य संचालकांच्या उत्तराची अजून प्रतीक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - किडनी तस्करी प्रकरणामध्ये डॉक्टरांची चौकशी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठीची परवानगी पोलिसांनी आरोग्य संचालकांकडे मागितली आहे. तसे पत्र पोलिसांनी पाठवले आहे. मात्र, त्यावर अद्याप काहीही प्रतिसाद आल्यामुळे पोलिसांना डॉक्टरांवर कारवाई करणे अशक्य झाले असून, पोलिस आता आरोग्य संचालकांच्या उत्तराची प्रतीक्षा करत आहेत. गरीब लोकांना पैशाचे आमिष देऊन त्यांच्या किडन्या काढल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिस किडनी विकत घेणाऱ्यांपर्यंत पोहोचले आहेत. तसेच त्यामध्ये कोणकोणत्या डॉक्टरांचा सहभाग होता, तेसुद्धा समोर आले आहे. पोलिसांकडून सर्व चौकशी पूर्ण झाली आहे. मात्र, डॉक्टरांच्या कारवाईसाठी आरोग्य संचालकांची परवानगी मिळाल्यामुळे डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचे हात बांधले आहेत. किडनी तस्करी प्रकरणात डॉक्टरांची प्रमुख भूमिका आहे. त्यामुळे त्यांच्यावर व्होटा कायद्यांतर्गत कारवाईची परवानगी देण्यात यावी, असा उल्लेख पोलिसांनी आरोग्य संचालकांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. किडनी तस्करी कायदा व्होटा लावण्याची परवानगी पोलिसांना देण्यात आली, तर नागपूर आणि औरंगाबादच्या डॉक्टरांवर कारवाई होणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. आतापर्यंत या प्रकरणात किडनी काढण्यात आलेल्यांची संख्या सातवर पोहोचली आहे. ज्यांना पीडितांच्या किडन्या बसवण्यात आल्या त्याच्या वैद्यकीय तपासणीतून ते सिद्धही झाले आहे. पीडितांचे बनावट मतदान कार्ड बनवल्याप्रकरणी पोलिसांनी खदान येथील प्रशिक वानखडे याला अटक केली होती. त्याची पोलिस कोठडी संपल्यामुळे त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे, तर किडनी पीडितांच्या नातेवाइकांच्या बँकेच्या अकाउंटचा तपशील पोलिस जाणून घेत आहेत.
बातम्या आणखी आहेत...