आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून शहरामध्ये रंगणार ‘विश्वास करंडक’, अकोलेकरांना बालनाट्यांची मेजवाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - बऱ्याच काळापासून बालनाट्य चळवळीला आलेली मरगळ ‘विश्वास करंडक’मुळे दूर होणार आहे. 7 ते ११ सप्टेंबर दरम्यान अकोलेकरांसाठी बालनाट्यांची मेजवाणी राहणार आहे. प्रमिलाताई ओक सभागृह येथे गुरुवार, 7 सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता विश्वास करंडक बालनाट्य विभागीय स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. 
 
सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी विजय दळवी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार असून, आयोजन समिती प्रमुख प्रा. मधु जाधव यांची उपस्थिती राहणार आहे. पाच दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेत विभागातील ३७ शाळेतील बाल कलावंत त्यांची कला सादर करणार आहे. तर ११ सप्टेंबर रोजी पारितोषिक वितरण समारंभ होणार असून, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींची उपस्थिती राहणार आहे. या स्पर्धेसाठी अायोजक समितीचे प्रमुख प्रा. मधु जाधव, प्रशांत गावंडे, डॉ. सुनिल गजरे, अशोक ढेरे, अमोल सावंत, आशिष राठी, ललीत राठी, अविनाश पाटील, अनिल कुळकर्णी, प्रदीप खाडे यांच्यासह पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. शालेय जीवनात विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने जेआरडी टाटा स्कूल अॅन्ड एड्युलॅबच्या वतीने बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, जीएमडी मार्केट येथील ज्ञान हब राठी पेपर ट्रेडर्स हे स्पर्धेचे प्रायोजक आहेत. 
 
आज होणार ११ बालनाट्य : स्पर्धेच्या पहिल्या दिवशी एड्युविला पब्लिक स्कूल, माँ रेणुका मराठी शाळा, जानकीबाई डिजीटल स्कूल, ब्ल्यू लोटस स्कूल, जे. डी. प्लॅटिनियम स्कूल, ज्युबिली सीबीएसई स्कूल, पांडुरंग भिरड स्कूल, मनपा शाळा क्रमांक २६, सुफ्फा हायस्कूल, बियू कॉन्व्हेंट, ज्ञानदर्पण स्कूलचे कलावंत नाटक सादर करतील. 
 
पारितोषिकांचे स्वरूप असे 
यास्पर्धेत उत्कृष्ट ठरणाऱ्या पहिल्या नाटकाला १० हजार रोख आणि करंडक देण्यात येणार आहे. तर हजार रुपये द्वितीय आणि हजार रतृतीय क्रमांकासाठी पारितोषिक राहणार आहे. याशिवाय उत्कृष्ट दिग्दर्शक हजार, हजार हजार रुपये देण्यात येतील. उत्कृष्ट अभिनय, उत्कृष्ट वेशभूषा, प्रकाश योजना, पार्श्व संगीत, उत्कृष्ट नेपथ्य या प्रत्येक गटासाठी प्रथम १०००, द्वितीय ७०० तृतीय ५०० रोख पारितोषिक देण्यात येईल. सोबतच हजार रुपये रोख ज्युरी स्पेशल अवॉर्ड आणि हजार रुपये जर्नालिस्ट स्पेशल अवॉर्ड देण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक कलाकाराला सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून सहभागी शाळेला २००० रुपयांची पुस्तके, भेटवस्तू देण्यात येणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...