आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोठडीतील तीनही आरोपींची कसून चौकशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - बिल्डर किशाेर खत्री हत्याकांडातील आरोपींना जुने शहर पोलिस पुन्हा एकदा तपासकामी घेऊन गेले होते. पोलिसांनी तिघांचीही कसून चौकशी केली आहे. या प्रकरणात पोलिस खात्यातील एक कर्मचारी अडकलेला असून, तो पोलिसांच्या नजरकैदेत आहे.

किशोर मदनलाल खत्री हत्याकांडातील तिसरा आरोपी अंकुश चंदेल यास बुधवारी पोलिसांनी अटक केली. हत्याकांडातील प्रमुख आरोपी असलेले रणजितसिंह चुंगडे याला मदत करणारा चालक राजीवसिंह नारायणसिंह मेहर अंकुश चंदेल याच्याकडून पोलिसांनी घटनेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. अंकुश चंदेल हा गीतानगरातील रहिवासी असून, त्याच्या मेहरच्या मदतीने चुंगडे याने खत्रीचा खून करून मृतदेह सोमठाणा शिवारात फेकून दिला होता. या प्रकरणात आणखी एकास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, त्यास अद्याप अटक करण्यात आली नाही. या प्रकरणातील आरोपींना १४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. शनिवारी त्यांचा पीसीआर संपणार आहे. त्यामुळे आता आरोपींची कारागृहात रवानगी होते की, तपासकामी आणखी पोलिस कोठडी मिळते याचा उलगडा शनिवारी होईल.

तो पोलिस नजरकैदेत : याप्रकरणात पोलिस मुख्यालयातील एक कर्मचारी असल्याचा संशय पाेलिसांना आहे. पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत. सध्या तो पोलिसांच्या नजरकैदेत असला, तरी त्याला अटक केली नाही.