आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभार समाज विकास परिषदेने घेतले वीस विद्यार्थ्यांना दत्तक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - कौटुंबिकआर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या हेतूने महाराष्ट्र कुंभार समाज विकास परिषद अकोलामार्फत दरवर्षीच गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना दत्तक घेतल्या जाते. त्यांना शैक्षणिक साहित्यसुद्धा वर्षभर पुरवले जाते. या वर्षी दत्तक योजनेसाठी या वर्षी २० विद्यार्थी पात्र करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या योजनेला दानशूर नागरिकांचे सहकार्य मिळते. इयत्ता वीपासून तर १२ वीपर्यंत दत्तक योजनेतील प्रत्येक विद्यार्थ्याला वर्षभर शैक्षणिक साहित्य पुरवल्या जाते.
समाजातील गरीब आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, केवळ शैक्षणिक साहित्य विकत घेता येत नाही म्हणून त्यांचे शिक्षण थांबू नये, या उद्देशाने महाराष्ट्र कुंभार समाज विकास परिषद अकोलाचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण साविकर यांनी ही विद्यार्थी दत्तक योजना २०१० पासून सुरू केली. दरवर्षीच दानशूर व्यक्तींना ते पोष्टाने पत्रक पाठवून या योजनेविषयी अवगत करून देतात. त्यानंतर आर्थिक मदत एकत्रित करून दत्तक योजनेतील पात्र विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप गजानननगर परिसरातील गोरोबाकाका मंदिर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येते. योजनेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येते, अशी माहिती या ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे साविकर यांनी सांगितली. या योजनेतील आर्थिक मदतीचा वाटा कुंभार समाजातील ४० टक्के इतर समाजातील ६० टक्के दानशूर नागरिकांचा असतो, असेही त्यांनी सांगितले.

सगे- सोयरे अन् मित्र योजनेतील दानशूर
परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मला कॉलेजमध्ये फीसाठी ६६ रुपये नव्हते. शिक्षण घेताना आलेल्या अडचणीतून ही योजना सुचली. सगे, सोयरे दानशूर व्यक्ती तसेच मित्र या याेजनेचे दाते आहेत, असे महाराष्ट्र कुंभार समाज विकास परिषदेचे अकोलाचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण साविकर यांनी सांगितले.

असे आहेत दत्तक योजनेतील विद्यार्थी : इयत्ता१२ वीचे विद्यार्थी, इयत्ता ११ वीचे विद्यार्थी, इयत्ता १० वीचे विद्यार्थी, इयत्ता वीचे विद्यार्थी, इयत्ता वीचे विद्यार्थी, इयत्ता वीचे विद्यार्थी यांचा या वर्षीच्या योजनेत समावेश आहे. प्रत्यक्ष सर्वेक्षण करून हे विद्यार्थी शैक्षणिक मदतीसाठी पात्र असल्याची खात्री करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...