आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडाणा: महिला वाहकाची छेडखानी; आगार प्रमुखाविरुद्ध गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा- वैद्यकीय रजेचा अर्ज देण्यासाठी गेलेल्या एका २८ वर्षीय महिला वाहकाची आगार प्रमुख खेडेकर यांनी छेडखानी करून तिला लोटपाट केली आहे. या प्रकरणी महिला वाहकाच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी मंगळवारी १४ फेब्रुवारी रोजी आगार प्रमुखाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

येथील आगारात कार्यरत महिला वाहकाने दिलेल्या तक्रारीत नमुद केले की, सोमवारी १३ फेब्रुवारी रोजी माझी ड्युटी क्रमांक ८४ लावण्यात आली होती. परंतु माझी प्रकृती अस्वस्थ असल्या कारणाने मी कामावर जावू शकत नव्हती. प्रवाशांची गैरसोय होवू नये, यासाठी मी ड्युटी लावणारे उबरहंडे यांना त्याबाबतची कल्पना दिली. तसेच तिकिट कारकून जाधव यांना सुद्धा माहिती दिली. त्यावेळी त्यांनी मला वैद्यकीय रजा टाकण्यास सांगितले. सायंकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास आगार व्यवस्थापकांंच्या कार्यालयात गेले. त्यावेळी त्यांना आजारपणाचे सर्व वैद्यकीय कागदपत्र दाखवले. परंतु त्यांनी काहीही ऐकून घेता माझी छेडखानी करून लोटपाट केली. 

एवढेच नव्हे तर तुम्ही महिला वाहक जास्तच शेफारल्या असून, कशी काय नोकरी करता. माझ्याशी गाठ आहे. मी म्हणेल तसे वागावे लागेल. बोलावले तेव्हा मला भेटायला यावे लागेल, अशी धमकी दिली. त्यामुळे अश्लील भाषेत बोलून छेडखानी लोटपाट करणाऱ्या आगार प्रमुख आर. डी. खेडेकरविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 
बातम्या आणखी आहेत...