आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्याच्या इतिहासातील आजपर्यतची हुक्का पार्लरवरील सर्वात मोठी कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाॅटेलमध्ये जप्त करण्यात आलेला हुक्का पॉट - Divya Marathi
हाॅटेलमध्ये जप्त करण्यात आलेला हुक्का पॉट
अकोला - जिल्हापोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी पातूर रोडवरील अमनदीप ढाब्यावर अवैधरित्या सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर शनिवारी मध्यरात्री छापा टाकला. यावेळी त्यांनी १० शिक्षक-मुख्याध्यापकांसह १० विद्यार्थांना रंगेहात पकडले. त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता बहुतांश आरोपींनी ड्रग्सचे सेवन केल्याचे आढळून आले. 
 
अकोला जिल्ह्याच्या इतिहासातील आजपर्यतची हुक्का पार्लरवरील ही सर्वात मोठी कारवाई आहे. शिक्षक दिन होऊन पाच दिवस उलटत नाही तोच शिक्षकांवर कारवाई करण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रात संताप व्यक्त होत आहे. जुने शहर पोलिसांच्या आर्शीवार्दाने पातुर रोडवरील नावाजलेल्या अमनदीप ढाब्यावर मोठया प्रमाणात अवैधधंदे चालत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून येथे बेकायदेशीररित्या ‘हुक्का पार्लर’ चालविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांना मिळाली. त्यांनी पथकासह शनिवारी मध्यरात्री गंगा नगर येथील रहिवासी मोहम्मद मुख्तबीर शेख बशीर याच्या मालकीच्या अमनदीप ढाब्यावर छापा टाकला. या छापेमारीत मुख्याध्यापक, शिक्षकांसह विद्यार्थी ढाबा मालकास अटक करण्यात आली. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्यामध्ये अकोल्याच्या शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या.चा संचालक संजय इंगळे याच्यासह महेश सिताराम मानकरी (वय ३९ नोकरी- शिक्षक गाडगेवाडी पातुर), दिनेश आत्मारात केकन (वय ४० शिक्षक रामनगर पातुर), संतोष तेजसिंह राठोड (वय ४३ शिक्षक,रामनगर पातूर), विजय पांडुरंग भुतकर (वय ३८ शिक्षक गाडगेवाडी पातूर), सुनील ज्ञानदेव गवळी (वय ३६ शिक्षक शिक्षक कॉलनी पातुर), गोपीकृष्ण राजाराम ऐनकर (वय ५१ शिक्षक रेणुका नगर पातूर) , सुखदेव रामजी शिंदे (४० शिक्षक शिवनगर पातुर), अनील नामदेव दाते (४४ शिक्षक रंगारहट्टी पातुर), संजय देवराव इंगळे (४३ शिक्षक बाळापुर वेस पातुर), धिरन नंदु यादव (३२ शिक्षक चिखलगाव) शिक्षकांना अटक केली आहे. तर सिंधी कॅम्पमधील कच्ची खोली येथील रहिवासी गिरीष गोपालदास वलेजा (१९), अमीत मुरलीधर गुरनानी (१८), भरत विजयकुमार हेमनानी (१९), कमल सुनीलकुमार वलेजा (१८), शशांक रमेश चावला (१८),सागर भामर पंजवानी (१८),राहुल विजय दुर्गीया (२०),राहुल मनोजकुमार राजपाल (१८), पत्रकार कॉलनीतील देवेश दिलीपकुमार खेमानी (१८), निशांत गोपान चंदवानी (१९) यांचा समावेश आहे. शिक्षक संजय इंगळे याच्याकडून पोलिसांनी एक लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यासोबतच हुक्का पार्लरसाठी वापरण्यात येत असलेली मोठी साधन सामग्री ताब्यात घेण्यात आली अाहे. महागडे तंबाखूजन्य ड्रग्स’ हुक्का पॉट ही जप्त केल्याची माहिती आहे. अटक करण्यात आलेल्या शिक्षक विद्यार्थी हॉटेल मालकावर कलम ३३(डब्लू), १३१ महाराष्ट्र पोलिस कायदाकलम ४,२१ चे सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ कलम २००३ नुसार कारवाई करण्यात आली. 
 
प्रशासन करणार कारवाई : १० शिक्षक हुक्का पार्लरमध्ये पकडण्यात आल्यानंतर शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या या शिक्षकांवर जिल्हा परिषद प्रशासन काय कारवाई करते याकडे लक्ष लागून आहे. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, सर्व शिक्षक जिल्हा परिषद शाळेचे... 
बातम्या आणखी आहेत...