आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अार्थिक वर्षातील शेवटची सभाही गाजणार, काेट्यवधी रुपयांच्या याेजनांचे प्रस्ताव वेळेवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - अार्थिकवर्षातील जिल्हा परिषदेची शेवटची सभा २३ मार्च राेजी अायाेजित केली असून, सभेच्या विषयसूचीवर केवळ अर्थसंकल्प जनसुविधा यात्रा स्थळांच्या विकास कामांना मंजुरी देण्याचे विषय अाहेत. त्यामुळे काेट्यवधी रुपयांच्या याेजनांच्या प्रस्ताव लाभार्थी यादीला मंजुरी देण्याचा विषय वेळेवर मांडल्यास विराेधक अाक्रमक हाेणार अाहेत. 
 
कधी सत्ताधारी भारिप-बमसंमधील अंतर्गत राजकारण तर कधी विराेधक-सत्ताधाऱ्यांमध्ये हाेणाऱ्या कुरघाेडीमुळे जिल्हा परिषदेच्या काेट्यवधी रुपयांच्या याेजना रखडल्या अाहेत. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महिला बाल कल्याण समितीच्या सभेत याेजना राबवण्यात अपयश अाल्याने लाभार्थी हिस्सा परत करण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांवर अाेढवली हाेती. सध्या ३१ मार्च अर्थात अार्थिक वर्ष संपण्यासाठी २० दिवस शिल्लक असून, काेट्यवधी रुपयांच्या याेजना राबवण्याचे अाव्हान सत्ताधाऱ्यांसमाेर उभे ठाकले अाहे. २३ मार्च राेजी अायाेजित सभेत कदाचित केवळ कागदावर नियाेजन याेजना मंजूर हाेतीलही. मात्र या याेजनांना लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत केव्हा पाेहाेचेल, या प्रश्नांचे उत्तर अद्यापही मिळालेले नाही. 
 
गदाराेळ हाेण्याची शक्यता : मागीलवर्षी डिसेंबर २०१६ यंदा २८ फेब्रुवारी २०१७ रोजी झालेल्या दाेन्ही सर्वधारण सभा वेळेवर अालेल्या विषयांवरून गाजल्या हाेत्या. २३ मार्च राेजी हाेणाऱ्या सभेत थेट विकास कामांबाबत जनसुविधा यात्रा विकास कामांचा प्रस्ताव वगळल्यास इतर विषय नाेटीसमध्ये नमूद नाहीत. त्यामुळे सभेत वेळेवर विषय मांडल्यास गदाराेळ हाेण्याची शक्यता अाहे. त्यामुळे या सभेकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. 
 
४४ काेटी ६७ लाख रुपये शिल्लक 
जिल्हापरिषदेचा सन २०१६-१७ साठीचा ४४ काेटी ६७ लाख ८३ हजार रुपये शिल्लक असल्याची बाब २१ जानेवारी राेजी झालेल्या अर्थ समितीच्या सभेत उजेडात अाली हाेती. जिल्हा परिषदेला सन २०१६-१७साठी एकूण ५१ काेटी ४२ लाख ३१ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला. यापैकी डिसेंबर अखेरपर्यंत ४४ काेटी ६७ लाख ८३ हजार २२० रुपये शिल्लक राहिले अाहेत. त्यामुळे अाता ३१ मार्चअखेर हा निधी खर्च करण्याचे अाव्हान प्रशासनापुढे उभे ठाकले अाहे. 
 
असे हाेणार कामकाज 
झेडपी सर्वसाधारण सभा २३ मार्च राेजी हाेणार असून, यासाठी चार विषयांचा उल्लेख नाेटीसमध्ये केला अाहे. 
१) २८ फेब्रुवारी राेजी झालेल्या सभेच्या इतिवृत्त मंजूर करणे. 
२) २०१६०१७च्या सुधारित अाणि सन २०१७-१८च्या मूळ अर्थसंकल्पाला मंजुरी देणे. 
३) बाभुळगाव येथील शिकस्त ग्रा.पं. इमारतीला पाडण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देणे. 
४) जनसुविधा, यात्रा स्थळांच्या विकास कमांना मंजुरी देणे. 
बातम्या आणखी आहेत...