आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधी महाविद्यालयांमधील सत्र १९ पासून सुरू होण्याची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - विविध कारणांमुळे वारंवार पुढे ढकललेली विधी महाविद्यालयाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया एकदाची दुसऱ्या टप्प्यात पोहचली असून, १४ सप्टेंबरपासून पहिला कॅप राऊंड सुरू होत आहे. दरम्यान ही प्रक्रिया सुरू व्हावी म्हणून प्रवेशास इच्छूक विद्यार्थ्यांकडून महाविद्यालय निवडीबाबतचे पसंती क्रम गुरुवार, सप्टेंबरपर्यंत नोंदवून घेण्यात आले.
विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शासनाने यावर्षीपासून प्रवेशपूर्व परीक्षा लागू केली आहे. त्यामुळे विधी शाखेची एकूणच प्रवेश प्रक्रिया लांबली आहे. साधारणत: दरवर्षी १५ जुलैच्या आसपास विधी महाविद्यालये सुरू होत होती. परंतु या वर्षी अद्यापही िवद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले नाहीत.

शहरात अकोला विधी महाविद्यालय आणि नथमल गोयनका विधी महाविद्यालय अशी विधी अभ्यासक्रमाची दोन महाविद्यालये आहेत. यापैकी अकोला विधी महाविद्यालयात बारावीनंतरचा तर नथमल गोयनका महाविद्यालयात बारावी आणि पदवीनंतरचा असे दोन्ही अभ्यासक्रम शिकवले जातात. ही दोन्ही महाविद्यालये मिळून ६० अधिक ३६० अशा ४२० जागा आहेत. पुण्याच्या प्रवेशपूर्व परीक्षा केंद्रातर्फे यावर्षी विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सामाईक परीक्षा घेण्यात आली. सीईटी नावाने प्रचलीत या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांनाच विधी अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करता येणार होता. त्यानुसार संबंधितांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. आता त्यापैकी कोणाला कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल, हे १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या कॅप राऊंडनंतर कळणार असून, अंतिम यादी १९ सप्टेंबरला घोषित केली जाईल, अशी माहिती प्रवेशपूर्व परीक्षा कक्षाच्या आयुक्तांनी दिली आहे.

प्रवेशपूर्व परीक्षा कक्षाच्या आयुक्तांनी घोषित केलेल्या वेळापत्रकानुसार मुदतवाढीनंतर १० ऑगस्टपर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्ज स्वीकारण्यात आले. त्यानुसार प्राप्त अर्जांची यादी तत्काळ घोषित केली जाऊन दुसऱ्या दिवशी हरकती सूचना स्वीकारल्या जाणार होत्या. कालांतराने प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्यांची अंतिम यादी घोषित केली जाऊन कॅप राऊंड सुरू होणार होते. मात्र, दरम्यानच्या काळात वेळापत्रकात बदल करण्यात आला.

असा होता जुना कार्यक्रम : प्रारंभीघोषित केलेल्या वेळापत्रकानुसार १८ ऑगस्टला प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होणार होती. त्यानंतर २२ ऑगस्टला संबंधित विधी महाविद्यालये त्या-त्या ठिकाणी पूर्णत्वास गेलेल्या पहिल्या कॅप राऊंडमधील प्रवेशाची यादी घोषित करून उर्वरित प्रवेशासाठी २४ ला दुसरा, तर ३१ ऑगस्टला तिसरा कॅप राऊंड सुरू करणार होती. अशाप्रकारे १२ सप्टेंबरला चौथा कॅप राऊंड सुरू होऊन २६ सप्टेंबरला विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला अंतिम स्वरुप दिले जाणार होते. मात्र, आता वेळापत्रक बदलले आहे.
प्रक्रियेनंतर माहिती
^विद्यार्थ्यांना कोठेप्रवेशमिळू शकतो, हे १९ तारखेला समाप्त होणाऱ्या कॅप राऊंडनंतर समजेल. त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश सुरू होणार असून अकोल्यातील महाविद्यालयांना किती विद्यार्थ्यांनी पसंती दर्शवली, हेही स्पष्ट होईल.'' रत्नाचांडक, प्राचार्या, अकोला विधी महाविद्यालय, अकोला
बातम्या आणखी आहेत...