आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२० कोटींच्या ‘एलईडी’ निविदा होणार मंजूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकोला शहरातील सर्व प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये लखलखाट निर्माण करणाऱ्या २० कोटी रुपयाच्या एलईडीच्या निविदांना मंगळवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरी दिली जाणार आहे. याच बरोबर महापालिकेच्या पॅनेलवरील विधिज्ञांच्या खर्चाबाबतही या सभेत निर्णय घेतला जाईल. 
 
महापालिका निवडणुकीची आचार संहिता लागु होण्यापूर्वी शासनाकडून मिळालेल्या दहा कोटी रुपयात महापालिकेचा दहा कोटी रुपयाचा हिस्सा टाकून २० कोटी रुपये खर्च करुन शहरात एलईडी लाईट बसविले जाणार आहेत. यात शहरातील प्रमुख मार्ग आणि चौकांचा समावेश आहे. याबाबत सर्व सोपस्कार पूर्ण झाल्या नंतर या कामाच्या निविदेला मंजुरी दिली जाणार होती. या अनुषंगाने स्थायी समितीची सभाही बोलावण्यात आली होती. मात्र ज्या दिवशी सभा होणार होती, त्याच दिवशी पदवीधर निवडणुकीची आचार संहिता लागु झाल्याने ही सभा घेता आली नाही. त्यामुळे एलईडी पद्धतीचे लाईट लावण्याचे काम रखडले होते. मात्र आता महापालिका निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आली आहे. त्याच बरोबर नविन स्थायी समिती अस्तित्वात यायला अवधी असल्याने आणि विद्यमान नगरसेवकांचा कालावधी आठ मार्च पर्यंत असल्याने स्थायी समितीची मंगळवारी सभा बोलावण्यात आली आहे. आधी ही सभा दोन मार्चला बोलावण्यात आली होती. मात्र स्थायी समितीतील १६ पैकी आठ सदस्यांचा कालावधी २८ मार्चला संपुष्टात येत असल्याने ही सभा मंगळवारी बोलावण्यात आली आहे. या सभेत एलईडीच्या कामांच्या निविदांना मंजुरी दिली जाणार आहे. 

आयुक्तांबाबत उत्सुकता 
महापालिकेत स्थायी समिती ही महत्वाची मानली जाते. सर्व आर्थिक धोरण स्थायी समितीच्या बैठकीत मंजुर केले जातात. एवढेच नव्हे तर मुख्य लेखा परीक्षक हे प्रशासनाला नाही तर स्थायी समितीला बांधील असतात. परंतु आता पर्यंत झालेल्या स्थायी समितीच्या एकाही बैठकीला आयुक्त स्वत: उपस्थित राहिले नाहीत. ही विद्यमान कार्यकारीणीची अखेरची सभा असल्याने या सभेला आयुक्त उपस्थित राहतात का? याबाबत नगरसेवकांमध्ये उत्सुकता लागली आहे. 
विकास वाट 
 
बातम्या आणखी आहेत...