आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवकांसह सदस्यांना हवी तिरंगी लढत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा झाल्याने आता इच्छुकांची लगबग सुरू झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीची घोषणा केली. भाजप-शिवसेनेची युती होण्याची पूर्णत: शक्यता आहे. मात्र, अकोला, वाशीम, बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाबाबत युतीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. अद्याप यावर निर्णय झालेला नसताना नगरसेवकांसह जिल्हा परिषद सदस्यांना मात्र ही निवडणूक तिरंगीच हवी आहे. काही मतदारांनी यासाठी देवाला साकडेही घातले आहे.
या मतदारसंघाची जागा आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवारही निश्चित केला आहे. परंतु, भाजप-शिवसेनेच्या युतीची घोषणा जाहीर झालेली नाही. विशेष म्हणजे आठ जागांपैकी सात जागांवर युती झाली तरी अकोला मात्र यास अपवाद ठरू शकतो. अथवा अंतिम क्षणी जागेची अदलाबदल होऊ शकते. अकोल्याची जागा भाजपला सोडून त्या मोबदल्यात दुसरी जागा शिवसेनेला मिळू शकते. त्यामुळे अकोल्याबाबत सर्वकाही अनिश्चित असल्याने सर्वांनाच उत्सुकता निर्माण झाली आहे. डिसेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत किमान अकोल्याबाबत तरी युतीबाबत निर्णय होण्याची अपेक्षा आहे. एकीकडे भाजप-शिवसेनेच्या नेत्यांमध्ये तसेच इच्छुकांमध्ये युती व्हावी, याबाबत एकमत आहे. परंतु, भाजप-शिवसेनेची युती झाल्यास दुरंगी लढत होईल. परंतु, युती झाल्यास तिरंगी लढत होईल.
तिरंगी लढत झाल्यास पक्ष आदेशाची पर्वा करणारे तसेच ज्या पक्षाचा उमेदवारच निवडणूक लढवणार नाही, त्या पक्षाचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांना तिरंगी लढतीचा खऱ्या अर्थाने फायदा मिळणार आहे. पुढील जानेवारी २०१७ ला महापालिकेची निवडणूक होत असल्याने निवडणूक लढवण्यासाठी नगरसेवकांना अर्थसाहाय्याची गरज आहे. ही गरज तिरंगी लढत झाल्यास अधिक बोली चढवून पूर्ण करता येणे शक्य असल्यानेच अनेक नगरसेवक ही लढत तिरंगी व्हावी, अशी इच्छा बाळगून आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नगरसेवक तसेच जिल्हा परिषद सदस्य यांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. इतर निवडणुकांप्रमाणेच विधान परिषदेच्या निवडणुकीतही रंगत येणार आहे. त्यासाठी विविध पक्षांचे सदस्य तयारीला लागले आहेत. घोडेबाजारही तेजीत आल्याचे दिसून येत आहे.
हालचालींना वेग
युतीबाबतअद्याप निर्णय झालेला नसला तरी इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. नगरसेवक तसेच जिल्हा परिषद सदस्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या असून, मतदारराजाला गोंजारण्याचे कामही सुरू झाले आहे.
दिव्य मराठी विशेष