आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - भारत निवडणूक आयोगाने २४ नोव्हेंबर रोजी राज्यातील आठ विधान परिषद मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. अकोला विधान परिषद मतदारसंघात अकोला, बुलडाणा वाशीम या तीन जिल्ह्यांचा समावेश असून, स्थानिक स्वराज्य संस्थांचे ७७९ सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दरम्यान, उमेदवारांसह प्रत्येकाने आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.
अकोला, बुलडाणा वाशीम मतदारसंघातील विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी संपत अाहे. २७ डिसेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या निवडणुकीची तयारी सुरू झाली अाहे. निवडणुकीची माहिती देण्याच्या अनुषंगाने प्रशासनातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी माहिती दिली. अकोला, बुलडाणा, वाशीम या तीन जिल्ह्यांसाठी मतदारसंघाची व्याप्ती असलेल्या क्षेत्रात शासकीय अनुदानातून करावयाचे नवीन भूमिपूजन, उद्घाटन सभारंभ स्थगित करण्यात यावेत. सर्व मंत्री महोदयांना शासकीय दौऱ्यावर असताना निवडणूकविषयक प्रचाराची कामे एकत्रितपणे करता येणार नाहीत. नवीन धोरणात्मक निर्णय ज्यामुळे मतदारसंघातील मतदारांवर परिणाम हाेऊ शकेल, असे निर्णय घेता येणार नाहीत. मतदारसंघातील कोणत्याही स्थानिक प्राधिकरणातील नियमित आवश्यक सभा घ्यावयाची असल्यास जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेऊन सभा घेता येतील. स्थानिक प्राधिकारी संस्थेच्या सभा घेणे आवश्यक असल्यास अशा सभांना परवानगी दिली जाऊ शकते.
कोणताही धोरणात्मक निर्णय, जसे अनुदान मंजूर करण्याला अनुमती देऊ नये. या निवडणुकीत स्थानिक प्राधिकारी संस्थेचे सदस्य असल्यामुळे सामान्यत: कायदा सुव्यवस्था संबंधात नवीन अडचणी उपस्थित होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासन पोलिस प्रशासन संयुक्तरीत्या प्रतिबंधात्मक कार्यवाही करतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली. या वेळी समन्वय अधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी उदय राजपूत, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांची उपस्थिती होती.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक डिसेंबर आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी १० डिसेंबरला होईल. उमेदवारी अर्ज १२ डिसेंबरपर्यंत मागे घेता येईल. मतदान २७ डिसेंबर रोजी होईल. मतमोजणी ३० डिसेंबरला होणार आहे.

एकलसंक्रमण पद्धतीने मतदान : विधानपरिषदनिवडणुकीच्या दृष्टिने अकोला, बुलडाणा वाशीम जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांना माहिती दिली जाणार आहे. यासाठी विविध ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी एकल संक्रमण पद्धतीने मतदान घेण्यात येणार आहे. अकोला ६, वाशीम बुलडाणा जिल्ह्यात १३ मतदान केंद्रे असतील. निवडणूक कार्यक्रमाबाबत अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षण, पोलिस अधिकाऱ्यांची बैठक लवकरच आयोजित केली जाणार आहे.

तर होणार कारवाई
कायदा सुव्यवस्था संबंधात नवीन अडचणी उपस्थित होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासन पोलिस प्रशासन संयुक्तरीत्या प्रतिबंधात्मक कारवाई करतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

निवडणूक कार्यक्रम
}निवडणुकीची अधिसूचना -डिसेंबर
}उमेदवारीअर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक -डिसेंबर
}नामनिर्देशनपत्राची छाननी -१० डिसेंबर
}उमेदवारीमागे घेणे -१२ डिसेंबर
}मतदान-२७ डिसेंबर
}वेळ-सकाळी ते दुपारी
}मतमोजणी-३० डिसेंबर
}निवडणूकप्रक्रिया पूर्ण -जानेवारी २०१६
अकोला विधान परिषद मतदारसंघातील मतदारांची स्थिती
जिल्हाजि.प. मनपा नगर परिषद नगरपंचायत एकूण
अकोला ५८ ७८ ११८ २५४
वाशीम ५८ १०१ १५९
बुलडाणा ७१ २६१ ३४ ३६६
एकूण १८७ ७८ ४८० ३४ ७७९