आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोटमध्‍ये कोरड्या विहिरीत पडलेल्या बिबट्यास काढले सुखरूप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट - प्रादेशिकवन विभागाच्या क्षेत्रातील शहानूर बिटमध्ये एका कोरड्या विहीरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याची १४ तासांच्या अथक परिश्रमानंतर आज सुटका करण्यात आली. अकोला वन विभागाच्या शहानूर बिटमधील शंकर वाळके यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत बिबट्याचा हा बछडा पडल्याचे सप्टेंबरला लक्षात आले. हे ठिकाण हे अकोली जहांगिरजवळ आहे. 
 
या घटना माहिती मिळताच वन खात्याचे अधिकारी तेथे पोहोचले. तसेच बिबट लहान असल्याने त्याला भूल देऊन बाहेर काढणे टाळण्यात आले. एक खाट विहीरीत सोडून त्यावर बिबट चढल्यावर बाहेर काढू असा विचार करून खाट विहीरीत सोडण्यात आली. पण, बिबट त्यावर चढल्याने तो प्रयत्न फसला. अखेर आज सकाळी अमरावती येथून रेस्क्यू टिम आली. त्यांनी विहीरीत जाळे सोडून बिबट्याच्या बछड्यास पकडले. बाहेर काढून त्याला पिंजऱ्यात ठेवण्यात आले. त्याच्यावर उपचार करून नंतर मेळघाटात सोडून देण्यात येईल, अशी माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली. या बचाव कार्यात अकोला वनविभागाचे डी. एफ. ओ. लोणकर, अमरावतीचे डिएफओ. हेमंतकुमार मीणा अकोला, एसीएफ सोनोने, अकोला आरएफओ अशोक वायाळ, राऊंड ऑफीसर अजय बावणे, प्रकाश गिते, अकोट वनरक्षक सरीता राऊत, धनंजय सुरूसे आदींनी भाग घेतला. मात्र यामुळे परिसरात बिबट मादीचा वावर असल्याची शंका निर्माण झाली आहे. 
बातम्या आणखी आहेत...