आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गत वर्षीच्या तुलनेने यंदा 28 टक्के कमी पेरणी; पाऊसही 35 टक्के कमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला- पावसाने दडी मारल्याने यंदा गतवर्षीच्या तुलनेने २८ टक्के पेरणी कमी झाली अाहे. यंदा १७ जुलैपर्यंत ६४ टक्के पेरणी झाली , तर गतवर्षी ९२ टक्के पेरणी झाली हाेती. त्यामुळे यंदा बहुतांश:श ठिकाणी दुबार पेरणी हाेणार असून, काही ठिकाणी तर तिबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर येणार अाहे.
 
गतवर्षीच्या तुलनेने यंदा १७ जुलैपर्यंत ३४.८५ टक्के कमी पाऊस पडला. कर्ज वितरणातही यंदा जिल्हा गतवर्षीच्या तुलनेने माघारला असून, खरीप हंगामासाठी एकूण लक्षांकाच्या तुलनेेने केवळ २९ टक्के कर्जाचे वितरण झाले अाहे. एकूण कर्ज वितरणाचे एकूण लक्षांक हजार १४० काेटी ५५ लाख असून, त्यापैकी ३३२ काेटी १७ लाख रुपयांचे वितरण करण्यात अाले. त्यामुळे जिल्ह्यातील शेती शेतकरी अडचणीत सापडले अाहेत.
 
जून महिन्यात काही भागात पाऊस झाल्याने पेरणीही अाटाेपली. मात्र त्यानंतर पाऊस रुसल्याने अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर अाेढवले अाहे. पातूर तालुक्यासह अनेक ठिकाणी तर शेतकऱ्यांवर तिबार पेरणीची वेळ अाली अाहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे मशागत, पेरणी, मजुरीचा खर्च वाया जाणार अाहे. अाता दुबार-तिबार पेरणीची वेळ अाल्यास शेतकऱ्यांना परत कर्जासाठी बँकेकडे जावे लागणार अाहे. अद्याप शेतकऱ्यांना १०० टक्के कर्ज वितरण करण्यात अालेले नाही.
बातम्या आणखी आहेत...