आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात साकारतेय पहिली लायब्ररी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पोलिस ठाणे म्हटले की 'दंडुका' 'बाजीराव'चे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. पुस्तके पोलिस असा विचारही कुणी करत नाही. मात्र, पुस्तके पोलिसांचा संबंध जुळवून आणला आहे सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याचे ठाणेदार घन:शाम पाटील यांनी! पोलिसांनी वाचावे, या भावनेतून त्यांनी पोलिस ठाण्यात लायब्ररीची निर्मिती केली आहे. निमित्त आहे देशभर साजऱ्या होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती महोत्सवाचे!
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या लायब्ररीचा उद््घाटन सोहळा होणार आहे. सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यातील लायब्ररी ही जिल्ह्यातील पहिलीच पोलिस ठाण्यातील लायब्ररी आहे.

देशभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे होत आहे. तोच धागा पकडून ठाणेदार घन:शाम पाटील यांनी पोलिस ठाण्यात लायब्ररी असावी त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज, थोर समाजसुधारक यांच्या पुस्तकांसह कायद्याची पुस्तके पोलिसांच्या वाचनासाठी उपलब्ध असावी, या उद्देशाने लायब्ररीचे निर्माण करण्याचा संकल्प केला. त्यानंतर त्यांनी लोकसहभागातून पोलिस ठाण्याच्या आवारात भव्य लायब्ररीच्या वास्तूचे निर्माण केले. या लायब्ररीमध्ये कायद्याच्या पुस्तकांसह पोलिसांसाठी महापुरुषांची पुस्तके कथा, कादंबऱ्याही उपलब्ध असणार आहेत. कामाचा ताणतणाव दूर करण्यासाठी पुस्तक हे सर्वात चांगले ज्ञानसंवर्धनासाठी आवश्यक असल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हेच अभिवादन असेल, या उद्देशाने लायब्ररीचे निर्माण करण्यात आल्याचे ठाणेदार पाटील म्हणतात. एप्रिलला गुढीपाडव्यानिमित्त सायंकाळी वाजता या लायब्ररीचे उद््घाटन जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा, अपर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर, पोलिस उपअधीक्षक प्रदीप चव्हाण शहरातील सर्व पोलिस ठाण्यांचे ठाणेदार उपस्थित राहणार आहेत.

पुस्तकांसाठी पुढे यावे
सततच्या कामामुळे पोलिस नेहमी तणावात असतो. कथा, कादंबऱ्या महापुरुषांची पुस्तके चाळली तर तणाव दूर होऊ शकतो. वाचन संस्कृती पोलिसांमध्येही रुजावी, या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती वर्षानिमित्ताने लायब्ररीची संकल्पना पुढे आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तके इतरही पुस्तके लायब्ररीसाठी देणाऱ्यांचे स्वागत आहे.