आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेला जाळल्याप्रकरणी जन्मठेप, शरीरसुखाची मागणी फेटाळल्याने पेटवले होते रॉकेल टाकून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महिलेला शरीरसुखाची मागणी केली. तिने त्यास नकार दिला. त्यानंतर त्याने अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले हाेते. ९६ टक्के भाजल्याने अखेर तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची सुनावणी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश ए.झेड. ख्वाजा यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
कैलास रामेश्वर थाडा असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कैलास थाडा हा कापूस खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो. त्याच्याकडे नात्याने दुरचा चुलतभाऊ कामाला होता. मात्र आपल्या चुलत भावाच्या पत्नीवर कैलास थाडा याचा डोळा असल्याने तो संधी शोधत होता. १६ फेब्रुवारी २००८ रोजी त्याच्या चुलतभावाचे नातेवाईकांचे निधन झाल्यामुळे चुलतभाऊ आणि त्याची पत्नी दोघे अहमदनगरला जाणार होते. मात्र या दिवशी सकाळी त्याने त्याच्या चुलतभावाला कापूस खरेदीसाठी सकाळीच पाठवले त्या दोघांची लक्झरी बसची दोन तिकिटे घेऊन तो त्याच्या घरी गेला. यावेळी त्याचा १५ वर्षाचा पुतण्या अाणि त्याची आई म्हणजे त्याची वहिनी घरी होती. यावेळी त्याने पुतण्याला गाडी सर्व्हिसिंगसाठी बाहेर पाठवले वाहिनीसोबत लगट करण्याचा प्रयत्न करीत त्याने तिला शरीरसुखाची मागणी केली. मात्र तिने त्यास विरोध दर्शवला. यावेळी त्यांच्यात भांडणही झाले. शेजारी जमा झाले. मात्र आमचे आपसातील भांडण असल्याचे सांगून त्यांनी कुणाला हस्तक्षेप करू दिला नाही. पुन्हा त्यांच्यात भांडण झाले आणि कैलास थाडा याने तिच्या अंगावर रॉकेल अोतून तिला पेटवून दिले. ९६ टक्के भाजल्या गेली. तेवढ्यात मुलगा घरी आला. त्याने कैलास थाडाने तिला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

मात्र चौथ्या दिवशी महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी रामदापेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र महिन्याभरानंतर महिलेच्या भावाला आपल्या बहिणीला जाळून मारल्याचे समजल्यानंतर त्याने रामदासपेठ पोलिस ठाण्यात १९ मार्च रोजी तक्रार दिली.

पोलिसांनी या प्रकरणी कैलास रामेश्वर थाडा याच्याविरुद्ध भांदवी ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. या प्रकरणाची सुनावणी सहायक पोलिस उपनिरीक्षक शांताराम अकोत यांनी केला. त्यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर या प्रकरणाची बुधवारी अंतिम सुनावणी झाली.

सरकार पक्षाने साक्षीदार तपासले. त्याच्या साक्षीपुराव्याच्या आधारे न्यायालयाने आरोपी कैलास रामेश्वर थाडा याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा पाच हजार रुपये दंड, दंड भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. मंगला पांडे यांनी युक्तीवाद करीत सरकार पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली.

असा झाला हाेता हत्येचा उलगडा
वहिनीला जाळून मारल्यानंतर आरोपी कैलास रामेश्वर थाडा याने त्याचा चुलतभाऊ मृतकचा मुलगा याला कुणालाही काहीही सांगण्यासाठी धमकावले जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र महिनाभरानंतर या प्रकरणाचे तपास अधिकारी शांताराम अकोत यांना संशय आला. त्यांनी मृतक महिलेचा भावाशी संपर्क साधत प्रकरणाच्या खोलात जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना वस्तुस्थिती कळली. त्यानंतर आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती.
बातम्या आणखी आहेत...