आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत:च्या 14 वर्षांच्‍या मुलीवर चाकूचा धाक दाखवून अत्‍याचार करणाऱ्या बापास जन्मठेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खामगाव - स्वत:च्या १४ वर्षे वयाच्या मुलीवर चाकूचा धाक दाखवून बळजबरीने वर्षापासून सतत शारीरिक व लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापास खामगाव न्यायालयाने आज डिसेंबर रोजी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. लहानपणीच आईचे छत्र हरवले, या घटनेच्या वर्षाआधीच आजी मरण पावली. त्यानंतर भावांनी तिचे पालन पोषण केले. या अल्पवयीन मुलीस स्वत:चा बाप मुकिंदा पुंडलिक इंगळे याने चाकूचा धाक दाखवत तिच्यासोबत बळजबरीने अत्याचार करायला सुरुवात केली. दरम्यान अचानक मुलीच्या मोठ्या भावाने ही घटना बघितली. यावेळी त्या नराधम बापाविरुद्ध शेगाव ग्रामीण पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी न्यायालयाने साक्षीदार तपासले. बलात्कार केल्याचे सिध्द झाल्याने अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधिश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच ५०० रुपये दंड दंड भरल्यास महिन्याचा सश्रम कारावास तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याने वर्षाची शिक्षा २०० रुपये दंड दंड भरल्यास महिला सश्रम कारावास सुनावला. याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एस. अहेरकर यांनी केला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता रजनी बावस्कार यांनी काम पाहिले.
बातम्या आणखी आहेत...