सिंदखेडराजा- येथील पिंपळगाव कुडा-लिंगा येथील मतदारांना वाहनाद्वारे वाटपासाठी जाणारी अवैध देशी दारु किनगावराजा ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी ऑक्टोबरच्या रात्री उशीरा जऊळका ते पिंपळगावकुडा रस्त्यावर सापळा रचून पकडली. यावेळी पिकअप वाहनांमध्ये ३५ देशी दारूचे बॉक्स किंमत ८७ हजार २५६ रुपये, लाख ५० हजाराचे पिकअप तसेच एक मोटार सायकल आरोपी जयराम रघू राठोड रा. गारखेड, बद्रीनाथ बाजीराव मिसाळ रा. चिंचोली बावणे त्याचे जवळून नगदी १६ हजार २६० रुपये, वाहन चालक प्रशांत किसन काळे, रा. चिंचोली बावणे यांचेकडून एकुण लाख ७८ हजार ५१६ रुपयाचा देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.