आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकलीचे साहस, अत्याचाराचा मुकाबला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट - शाळेतून दुपारच्या सुटीत घरी जात असलेल्या एका दहा वर्षीय चिमुकलीला घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या फरार असलेल्या ३० वर्षीय नराधमाला दहिहांडा पोलिसांनी २४ तासांत पकडले. अत्याचाराला विरोध करून चिमुकलीने पळ काढून परत शाळेत आल्यावर शिक्षिकांजवळ झालेला प्रकार कथन केला. त्यानंतर मुलीच्या वडीलांनी दहिहांडा पोलिसात तक्रार केली होती.

अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार येथून जवळच असलेल्या टाकळी खुर्द येथे हा प्रकार २६ सप्टेंबरला घडला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. टाकळी खुर्द येथे राहणारी दहा वर्षीय चिमुकली ही गावातीलच जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता चौथीमध्ये शिकते. सोमवार, २६ सप्टेंबरला दुपारी जेवणाच्या सुटीदरम्यान ती तिच्या मैत्रीणीसोबत घरी जाण्यासाठी निघाली.दरम्यान, आरोपी रूपेश सुभाष खंडेराव, वय ३० वर्ष या नराधमाने त्यांना आपल्या घरी नेले. त्यातील एका मुलीला चॉकलेटसाठी दुकानावर पाठवले. त्यानंतर त्याने चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. अत्याचाराचा विरोध करून चिमुकलीने तेथून पळ काढला. घरी आई वडील नसल्याने ती सरळ शाळेतच गेली. तिची घाबरलेली अवस्था पाहून शाळेतील शिक्षिकांनी तिची विचारपूस केली असता तीने घडलेला प्रकार सांगितला.

आरोपी रूपेश खंडेराव याच्याविरुद्ध कलम ३७६, ५११ नुसार गुन्हा दाखल केला. चिमुकलीने अत्याचाराला विरोध करून पळ काढताच नराधम फरार झाला. आरोपीचा ठाणेदार जी. के. वनारे, पीएसआय सतीश दोनकलवार यांनी शोध घेतला. त्यानंतर मंगळवार, २७ सप्टेंबरला दुपारी आरोपीला गजाआड केले. या घटनेमुळे अकोट तालुक्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
आणखी एका मुलीने करून घेतली सुटका
प्रतिनिधी /बार्शिटाकळी

शिकवणीसाठी शिक्षकाच्या घरी गेलेल्या दहाव्या वर्गातील अल्पवयीन मुलीला फूस लावून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न फसल्याने तिचा विनयभंग करणाऱ्या शहरातील नामांकित खासगी शाळेतील शिक्षकाला पोलिसांनी २७ सप्टेंबरला अटक केली. अत्याचाराला विरोध करत, नराधम शिक्षकाच्या तावडीतून आपली सुटका करून घेत विद्यार्थिनीने थेट बार्शिटाकळी पोलिस स्टेशन गाठून शिक्षकाविरुद्ध तक्रार दिली. बार्शिटाकळी शहरातील रामनगरातील रहिवासी शिक्षक गोपाल गणपत करणकार त्याच्या राहत्या घरी खासगी शिकवणी वर्ग चालवते. ज्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे, त्याच शाळेतील विद्यार्थी शिकवणीला येतात. २७ सप्टेंबरला सकाळी वाजता शिकवणीसाठी आलेल्या दहावीतील १५ वर्षीय मुलीला फूस लावून अतिप्रसंग करण्याचा शिक्षकाने प्रयत्न केला. मुलीच्या हा प्रकार लक्षात येताच तिने शिक्षकाच्या तावडीतून आपली सुटका करून घेत तीने बार्शिटाकळी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी शिक्षक गोपाल करणकरविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. पुढील तपास ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक संजय कोरचे, पोलिस कॉन्स्टेबल संजय सोनोने, संतोष वाघमारे करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...