आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1 हजार कोटींची कर्जमाफी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला मार्गदर्शन करताना पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर इतर. - Divya Marathi
बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला मार्गदर्शन करताना पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर इतर.
बुलडाणा- शासनाने शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज कृषि सन्मान योजना अंमलात आणली असून या योजनेनुसार दीड लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज सरसकट माफ करण्यात आले आहे. या योजनेचा सर्वात जास्त लाभ बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झाला आहे. जिल्ह्यात दीड लाखापर्यंत पीक कर्ज असलेल्या लाख ७० हजार ८५० शेतकऱ्यांच्या ९१३.२७ कोटी रुपयांच्या कर्जाला माफी मिळाली आहे. तसेच दीड लाखाच्यावर कर्ज असलेल्या हजार ९८० शेतकऱ्यांना ११८.६१ कोटी रुपयांची कर्जमाफी एकरकमी भरणा केल्यानंतर मिळणार आहे. एकूण १०३५.८८ कोटी रुपयांच्या कर्जाला माफी मिळेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने अर्ज भरावे. अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन असून ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज भरावे. असे आवाहन पालक मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी केले आहे. तसेच राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हमीभावाने तुर खरेदीचा निर्णय घेतला. भाव स्थिरता आणि बाजार हस्तक्षेप योजना अंमलात आणली. या योजनेतंर्गत जिल्ह्यात १३ खरेदी केंद्रावर ४९ हजार ८११ शेतकऱ्यांची एकूण ८.८९ लक्ष क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. या खरेदीपोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ४२८.३८ लाख रूपयांचे चुकारे जमा करण्यात आलेले आहे. 

स्वातंत्र्याच्या सत्तराव्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा जिल्हाधिकारी कार्यालय आवारात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार हर्षवर्धन सपकाळ, राहूल बोंद्रे, जि.प अध्यक्षा उमाताई तायडे, माजी आमदार विजयराज शिंदे, भाजपा जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, नगराध्यक्षा नजमुन्नीसा मो. सज्जाद, श्वेताताई महाले, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. षण्मुखराजन, जिल्हा पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना आदींची उपस्थिती होती.

संरक्षित सिंचन उपलब्ध करून देण्यासाठी शासन महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान राबवित आहे. या अभियानातंर्गत जिल्हाभरात सन २०१६-१७ साठी दुसऱ्या टप्प्यात २४५ गावांची निवड करण्यात आली. या गावांच्या शिवारात जलसंधारण मृदसंधारणाची हजार ९०८ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच १७२ कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांमुळे १.७१ लक्ष टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. तसेच हजार २४१ हेक्टर क्षेत्रावर दोन वेळच्या संरक्षीत सिंचनाची १२ हजार ६२५ हेक्टर क्षेत्रावर एक वेळच्या संरक्षीत सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. शासनाने ठिबक तुषार सिंचनाच्या संचावरील अनुदानही दिले आहे. त्यामुळे या सिंचन पद्धतीला हातभार मिळणार आहे. 

जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे योजनेतंर्गत शेततळ्यासाठी पात्र ठरलेल्या हजार ८३६ अर्जांपैकी हजार ९८२ शेततळ्यांना कार्यारंभ आदेश दिले आहे. त्यापैकी २०९८ शेततळी पुर्ण झालेली आहेत. तसेच जिल्ह्यात जलपूर्ती धडक सिंचन विहीर योजनेतंर्गत हजार २१ विहीरी सुरू करण्यात आल्या आहेत. त्यापैकी हजार ९२४ विहीरी पूर्ण झालेल्या आहेत. तसेच पिकांचा सर्वंकष विमा उतरविण्यासाठी प्रधानमंत्री कृषि पिक विमा योजना अंमलात आहे. या योजनेत खरीप रब्बी हंगामातील सर्व पिकांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच सन २०१६-१७ मध्ये खरीप हंगामात ३.८७ लक्ष शेतकऱ्यांनी ३.२६ लक्ष हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविला आहे.पंतप्रधान आवास योजनेतंर्गत सर्वांसाठी घर उपक्रम राबविण्यात येत आहे. कुठल्याही बेघराला हक्काचा निवारा मिळाला पाहिजे, असा शासनाचा मानस आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात या योजनेतून हजार ८३ घरकूलांचे कामे सुरू असून हजार ७२० घरकूलांना दुसरा हप्ता देण्यात आला आहे.जिल्ह्यात महात्मा फुले जनआरोग्य अभियानातंर्गत गतवर्षी २४ हजार ५१९ रूग्णांना १० रूग्णालयांच्या माध्यमातून लाभ देण्यात आला आहे. मराठवाडा विदर्भातील १४ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्याने १० हजार २५४ शेतकऱ्यांना लाभ देवून अव्वल क्रमांक पटकाविला आहे. 

पंचायत समिती मलकापूर शेगांव हगणदारीमुक्त झाली असून २८५ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त ठरल्या आहेत. जिल्ह्यात ३.६२ लक्ष कुटूंबांपैकी २.३६ लक्ष कुटूंबाकडे शौचालय आहेत. जिल्ह्याने यामध्ये ६५.१९ टक्के काम केले आहे. उर्वरित १.२६ लक्ष कुटूंबांमध्ये शौचालय बांधकाम करण्याचे कार्य प्रशासनाकडून सुरू आहे. नागरिकांना जलद तात्काळ शासनाच्या सेवा मिळाव्यात यासाठी ऑनलाईन सेवा देण्यात येत आहे. त्यामध्ये सात बाराचा सुद्धा समावेश आहे. बिनचूक ऑनलाईन सात बारा असण्याचे जिल्ह्याचे काम ९९.६१ टक्के आहे. तलाठी एस.पी श्रीनाथ, व्हि.पी मोरे, किशोर कऱ्हाळे, व्हि. एस शिंदे विनोद चिंचोले यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. संचलन नरेंद्र लांजेवार यांनी केले. जिल्हा उपनिबंधक चव्हाण यांनी वेतनाचा धनादेश कर्जमाफी निधीला दिला 

कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी एका महिन्याचे वेतन ४५ हजार ३६५ रूपयांचा धनादेश छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेला दिला. 

पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याहस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्ष लागवड बिज संकलन केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. त्यामध्ये पंचतारांकित शाळा पुरस्कार प्रबोधन विद्यालय यांना देण्यात आला. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत इयत्ता दहावी मध्ये राष्ट्रीय स्तरावर शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या शेगांव येथील साक्षी विलासराव मिरगे, गुंजन अतुल गट्टाणी, जळगांव जामोद यांचा सत्कार करण्यात आला. हागणदारीमुक्त झालेल्या पंचायत समिती मलकापूरचे सभापती संगीता तायडे, उपसभापती श्रीमती सीमा बगाडे, गटविकास अधिकारी अशोक तायडे, शेगांवचे सभापती विठ्ठलराव पाटील, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण सावळे यांचा सन्मान करण्यात आला. लोणारचे तहसीलदार सुरेश कव्हळे यांचा उत्कृष्ट तहसीलदार म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल गौरव करण्यात आला. 

जिल्ह्यात दोन ठिकाणी स्मार्ट शहरांची निर्मिती
कृषि संलग्न क्षेत्राला समृद्ध करणारा समृद्धी महामार्ग जिल्ह्यात तालुक्यांच्या ४९ गावांजवळून जात आहे. या महामार्गावर जिल्ह्यात मेहकर तालुक्यात आणि सिंदखेडराजा तालुक्यात एक अशा दोन ठिकाणी स्मार्ट शहरांची निर्मिती केल्या जाणार असल्याने विकास होईल. 
बातम्या आणखी आहेत...