आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आघाडीच्या तुतारीत शिरले अाता जागा वाटपाचे पाणी, सात प्रभागाच्या जागा वाटपावरुन आघाडीत बिघाडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- गेल्या अनेक दिवसापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत जागा वाटपाच्या चर्चेचा चोथा झाला आहे. सात प्रभागाच्या जागांबाबत एकमत होत नसल्याने आघाडीत बिघाडी झाली असून आघाडीच्या तुतारीत पाणी शिरल्याने आता आघाडी झाल्याची घोषणा होण्याची शक्यता धुसर झाली आहे. तर बुधवारी संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वच उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचे म्हटले अाहे. 

समविचारी पक्षांचे मत विभाजन टाळण्यासाठी कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी करण्याचे प्रयत्न गेल्या काही दिवसापासून सुरु होते. मुंबई येथे प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर काँग्रेस आणि दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने ४५-३५ चा प्रस्ताव दिला. असाच प्रस्ताव कॉग्रेसने दिला. त्यानंतर पुन्हा चर्चा झाली. त्यानंतर ३८-३८ चा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने दिला. या प्रस्तावावरही काँग्रेस नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र काँग्रेसकडून कोणताही निरोप आला नाही. या मागे प्रभाग क्रमांक १,२,९,११,१६,१७,१८ वर दोन्ही पक्षाने दावा केला.दोन्ही पक्ष हे प्रभाग एकमेकांसाठी सोडण्यास तयार नसल्याने हा तिढा वाढला.दरम्यान तीन फेब्रुवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.एक फेब्रुवारी पर्यंत आघाडीची घोषणा झाली नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांचे इच्छुक वैतागले आहेत. 
एकतर आघाडी झाल्याची घोषणा करा अथवा आघाडी तुटल्याची घोषणा करा, अशी थेट मागणीच दोन्ही पक्षांच्या इच्छुकांनी नेत्यांकडे केली. एक फेब्रवारीला दुपार पर्यंत आघाडी बाबतचा निर्णय होईल, अशी चर्चा सुरु होती. मात्र आघाडी झाली की नाही? याबाबत दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते काहीही सांगण्यास तयार नसुन केवळ चर्चा सुरु आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत हाेते. दिवसभराच्या घडामोडी लक्षात घेता, दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांची यादी निश्चित केली असून इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळेच आघाडी होण्याची शक्यता आता धुसर झाली आहे.दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्या नंतर दोन फेब्रुवारी रात्री पर्यंत आघाडीचा निर्णय झाल्यास दोन्ही पक्षांना जागा वाटपानुसार आपापल्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्याच्या सुचना द्याव्या लागणार आहेत. 
 
खापर कोण फोडुन घेणार? 
दोन्हीपक्षांचे नेते आघाडी बाबत थेट बोलण्यास तयार नसुन आघाडी तुटल्याची घोषणा जो पक्ष प्रथम करेन, त्यावर आघाडी तुटल्याचे खापर फुटेल, हे खापर आपल्यावर फुटु नये, यासाठी दोन्ही पक्षांचे नेते आघाडीची चर्चा सुरु आहे, अशी बतावणी दिवसभर करीत होते. 
बातम्या आणखी आहेत...