आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोकअदालतीने गोळा केला लाखांचा निधी, १२६ प्रकरणांचा निकाल घोषित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - फिरत्या लोक अदालतीने केलेल्या निवाड्यांमुळे जिल्हाभरातून लाख ८९ हजार २४६ रुपयांचा निधी गोळा झाला आहे. गेल्या महिनाभराच्या काळात ही अदालत अकोला जिल्ह्यात होती. त्या दरम्यान ८५४ खटल्यांचा निवाडा करण्यात आला. एकूण २३५० खटले या लोकअदालतीपुढे ठेवण्यात आले होते.
सप्टेंबरच्या प्रारंभी जिल्ह्यात दाखल झालेल्या फिरत्या न्यायालयाने पहिल्या दोन दिवसांतच दोनशेवर खटल्यांचा निवाडा केला होता. अकोल्यातील उद््घाटनानंतर हे न्यायालय बोरगाव मंजू येथील ग्रामपंचायत कार्यालयात भरवण्यात आले होते. त्यानंतर विविध तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती आणि गावांच्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात ही अदालत भरवली गेली.

न्यायमूर्ती एस. एस. हिरुरकर यांच्या नेतृत्वातील या अदालतीच्या माध्यमातून मोटार वाहन, आपसी वाद-विवाद, बँकांची वसुली, वजन-मापांच्या तक्रारी, कौटुंबिक वाद आदी खटल्यांची सुनावणी केली गेली. हे फुरते न्यायालय म्हणजे न्यायाधीश, वकील, लुपीक आणि इतर साधन-सामग्रीसह सुसज्ज असे वाहन होते. या वाहनात ध्वनीक्षेपण यंत्रणा, संगणक इतर यंत्रे लावण्यात आली होती. अकोला तालुक्यातील कारवाईनंतर तेल्हारा, बाळापुर, पातुर, बार्शीटाकळी मुर्तीजापूर तालुक्यात खटल्यांची सुनावणी करुन ते नुकाली काढण्यात आले. लोकअदालतीपुढे एकूण २३५० खटले ठेवण्यात आले होते. त्यापैकी ८५४ खटल्यांचीच सुनावणी पुर्णत्वास जाऊ शकली. प्रत्येक दिवशी नवीन गावात ही अदालत भरवली गेली. या दरम्यान ४१ दिवाणी खटल्यांपैकी खटले निकाली निघाले. तर फौजदारीच्या १९४९ प्रकरणांपैकी ७२३ प्रकरणांमध्ये निकाल दिला गेला. न्यायालयात दाखलपूर्व ३६० खटलेदेखील या लोकअदालतीपुढे ठेवण्यात आले होते. त्यातील १२६ प्रकरणांमध्ये निकाल घोषित झाला.

हे होते जनजागरणाचे विषय : लोक अदालतीच्या माध्यमांतून बहुतेक ठिकाणी विधी साक्षरता शिबिरे घेण्यात आली. यामध्ये बेटी बचाव-बेटी पढाव, मोटार वाहन कायदा, घरगुती कायदे, विधी सेवा प्राधिकरणाचा कायदा, महिला-लहान मुले ज्येष्ठ नागरिकांसाठीचे कायदे, हुंडाविरोधी कायदा, एफआयआरचा कायदा, मानवाधिकार, हिंदू विवाह कायदा पर्यायी न्याय निवारण व्यवस्था आदी विषयांचा समावेश होता.

मुक्कामाच्या ठिकाणी जनजागृती शिबिरे : या वाहनाचा मुक्काम ज्या गावात होता, त्या गावापासून दोन-तीन किलोमीटरच्या परिघातील अपीलार्थींनाही या लोकअदालतीमध्ये सहभागी करुन घेतले गेले. शिवाय न्यायनिवाडा आटोपला की विधी साक्षरताविषयक जागृती करणारी शिबिरेही घेण्यात आली. या माध्यमातून लोकांमध्ये कायदेविषयक जनजागरणाचा उद्देश पूर्ण झाला.
बातम्या आणखी आहेत...