आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्या 146 लक्झरी चालकांवर कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंदखेडराजा - ऐन सणासुदीच्या दिवसात तिकीट दर वाढवत प्रवाशांची आर्थिक लुट करुन अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या १४५ लक्झरी बसेसवर विविध कलमांखाली पोलिसांनी १६,१७ ऑक्टोबर रोजी कारवाई केली. या कारवाईत लाख हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे, उप विभागीय पोलीस अधिकारी बी. एन. नलावडे यांच्या मार्गदर्शनात किनगावराजा ठाणेदार सेवानंद वानखडे त्यांच्या सहकारी पोलिसांनी ही कारवाई केली. सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथील जुन्या टोलनाक्यावर १६ ऑक्टोबर रात्री ११ वाजेपासून १७ ऑक्टोबर सकाळी वा. पर्यंत नाकाबंदी करण्यात आली होती. 
 
या वेळात लक्झरी बसेसची चौकशी तपासणी करून कारवाई करण्यात आली. त्यामध्ये अवैध प्रवाशी वाहतूक कलम ६६ (१)/ १९२ अंतर्गत ९७ लक्झरी बसेस चालकांकडून एक लाख ९२ हजार रु. तसेच विविध कलमांखाली ४९ लक्झरी बसेस चालकांकडून १३ हजार ४०० रु. अशी एकूण १४६ बसेसवर कारवाई करीत लाख हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याचवेळी एका वाहनचालकावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११०/११७ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 
 
ही धडक कारवाईत किनगावराजा ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्यासोबत दुय्यम ठाणेदार किशोर शेरकी, जमादार अशोक मांटे, शेषराव सरकटे, दत्तात्रय लोढे, नाईक पोलीस भगवान काकड, अशोक खार्डे, विनोद राजपूत, गणेश बांडे, शिपाई नाजुकराव वानखडे, तेजराव भोकरे, श्रावण डोंगरे, गजानन सानप, विनायक मोरे, महिला पोलीस शिपाई जानकी केवट, गीता सावलकर, मीना भिलावेकर आदींनी सहभाग घेतला. या कारवाईमुळे लक्झरी चालकांचे धाबे दणाणले असून, सर्वसामान्य जनतेतून स्वागत होत आहे. 
 
पोलिसांची कारवाई स्तुत्य 
ऐन सणासुदीच्या दिवसात ग्राहकांची कोंडी करीत आर्थिक पिळवणूक करणाऱ्या लक्झरी चालकांवरील किनगावराजा पोलिसांनी केलेली कारवाई स्तुत्यच आहे. - रमेश कोंडणे, दुसरबीड 
बातम्या आणखी आहेत...