आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पा अगले बरस तुम जल्दी अाना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - उत्साहअन् अानंदाची उधळण करत लाडक्या गणरायाला २७ सप्टेंबर रोजी अकोलेकरांनी निरोप दिला. मोठ्या उत्साहात बाप्पांची शहरातून मिरवणूक काढली. यंदा डीजेला बंदी असल्याने पारंपरिक वाद्य, ढोल-ताशांच्या गजरात निरोप देतानाच, "पुढील वर्षी लवकर या', असे साकडे गणेशभक्तांनी घातले.
शहराचे आराध्यदैवत श्रीराजराजेश्वर मंदिर येथे पहिला मानाचा बाराभाई गणपतीचे सकाळी ९.३० वाजता परंपरेनुसार नाथ परिवाराने पूजन केले. पालखी उचलून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. जय हिंद चौक येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे मिरवणुकीतील सर्व मंडळांचे स्वागत पूजन केले. सकाळी ११ वाजता पहिला मानाचा बाराभाई गणेशाचे शहराच्या प्रथम नागरिक महापौर उज्ज्वलाताई देशमुख, खासदार संजय धोत्रे, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, प्रथम महापौर सुमनताई गावंडे, उपमहापौर विनोद मापारी, अॅड. मोतीसिंह मोहता, माजी महापौर मदन भरगड, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा, महापालिका आयुक्त अजय लहाने, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार संतोष शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप चव्हाण, उपायुक्त माधुरी मडावी, नगरसेवक विजय अग्रवाल, भाजपचे महानगराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, गटनेते हरीश आलिमचंदानी, राकाँचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या, गुलालाची उधळण तसेच पुष्पाहार अर्पण करून पूजन केले. मिरवणूक शांततेत शिस्तबद्धरीत्या पार पडावी, यासाठी सिद्धार्थ शर्मा, नीरज सुरेंद्र शहा, बळीराम चापले, माधवराव पटवी, अॅड. सुभाषसिंग ठाकूर, रमाकांत खेतान, अॅड. अशोक शर्मा, मनोज खंडेलवाल, विजय जयपिल्ले, श्रीकृष्ण ढोरे, विनीत पाटील, संग्राम गावंडे, विजय तिवारी, संतोष पांडे, मनोज साहू, संतोष अग्रवाल, प्रमोद पारिक, सुरेश शर्मा, मनीष हिवराळे, राजेश मिश्रा, गजानन घुमारे आदींनी सहकार्य केले.