आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१९१ बालकांची घालवून दिली अाई-वडिलांची भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जन्मदात्या मायबापापासून दुरावलेल्या १९१ बालकांना महिन्याभरातच पाेलिसांनी अाॅपरेशन मुस्कानच्या माध्यमातून पुन्हा त्यांच्या अाई-वडिलांची भेट घालवून िदली. पोलिस जुलैपासून ऑपरेशन मुस्कान राबवून बेवारस, बेपत्ता रस्त्यावर भीक मागणारे अाणि रागाच्या भरात घर सोडून गेलेल्या मुलांचा शोध घेत आहेत.

जुलै २०१५ पासून संपूर्ण जिल्ह्यात जिल्हा पोलिस दलाने ऑपरेशन मुस्कान राबवले. १८ वर्षांआतील बालके वाईट प्रवृत्तीला लागू नये म्हणून बेवारस बालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू अाहे. तसेच ज्या बालकांचे कोणीही नाही, अशा बालकांची बालकल्याण समितीमार्फत बालगृहात व्यवस्था करणे, जेणेकरून त्यांची शिक्षणाची इतर जबाबदारी शासनाकडून करता येईल, या सर्व गोष्टी यशस्वीरीत्या पूर्ण करण्याचे आव्हान पोलिस विभागाकडे देण्यात आले होते. अकोला पोलिस दलाने ही कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी यशस्वीरीत्या पार पाडली. पोलिसांच्या रेकाॅर्डवर ३१ हरवलेले बालके होते. त्यांपैकी १६ बालके ज्यामध्ये १० मुले मुली यांना एका महिन्यात शोधून काढले. त्यानंतर बालकल्याण समितीसमोर हजर केलेल्या २६ बालकांपैकी २० बालके ज्यामध्ये १६ मुले, मुली यांना त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यात आले. उत्तराखंड येथील १० वर्षीय बालक रशिद हारुण शेख याला पोलिस हृषीकेश हरिद्वार येथे घेऊन गेले तेथे त्याच्या घराचा शोध घेतला आणि त्याला त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील पाच बालके बैतूल येथील चार बालके, इंदूर येथील एक बालक, कल्याण येथील एक बालक, सातारा जिल्ह्यातील कराड येथील एक बालकांना आई-वडील पालकांच्या ताब्यात दिले, तर सहा बालके बालकल्याण समितीद्वारे सुधारगृहात दाखल केले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी दिली.

अभिनंदन आणि बक्षीस
ऑपरेशनमुस्कानमध्ये काम करणारे पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांचे पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना बक्षिसेसुद्धा जाहीर केले आहेत. लवकरच एका कार्यक्रमात त्यांना बक्षिसे देण्यात येणार आहेत.