आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षणाची सोडत: शहराचा महापौरपद खुल्या प्रवर्गातील, साेडतीनंतर दावेदारांची संख्या वाढीची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यापासून त्यापूर्वीही उत्सुकता लागलेल्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत तीन फेब्रुवारीला मुंबईत झाली. अकोला महापालिकेचे महापालिकेचे महापौरपद खुल्या प्रवर्गाला मिळाले आहे. खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद असल्याने सत्ता कोणत्याही पक्षाची येवो, दावेदारांची संख्या मात्र अधिक राहणार आहे. 

२००१ महापालिका अस्तित्वात आली. पहिले महापौरपद ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाले. प्रथम महापौर होण्याचा मान सुमनताई गावंडे यांना मिळाला. तर अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्या नंतर खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद आरक्षित होते. महापौर होण्याचा दुसरा मान अश्विनीताई हातवळणे यांना मिळाला. २००७ च्या निवडणुकीच्या वेळी महापौरपद ओबीसी सर्व साधारण साठी आरक्षित झाले. तिसरे महापौर होण्याचा मान मदन भरगड यांना मिळाला तर चौथे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी निघाल्याने सुरेश पाटील महापौर झाले. 

२०१२ च्या निवडणुकीत महापौरपद अनुसुचीत जाती महिलांसाठी राखीव निघाले. कॉग्रेस आणि भाजपला १८-१८ सम-समान जागा मिळाल्या. मात्र कॉग्रेसकडे या प्रवर्गाचा उमेदवार नसल्याने भारिप-बमसंला महापौरपद देऊन कॉग्रेसने सत्ता काबीज केली. अडीच वर्षाच्या काळा नंतर महापौरपद खुला प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित निघाले, त्यामुळे सहाव्या महापौर होण्याचा मान उज्वला देशमुख यांना मिळाला. त्यामुळेच २०१७ चे महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होणार? याबाबत उत्सुकता वाढली होती. आता पर्यंत निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत झाली. मात्र यावेळी पहिल्यांदाच महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्या नंतर काढण्यात आली.
 
त्यामुळे महापौरपदाच्या आरक्षणाकडे लक्ष लागले होते. मुंबईत तीन फेब्रुवारीला महापौर आरक्षणाच्या सोडतीत महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी (सर्व साधारण) आरक्षित झाले. महापौरपद सर्व साधारण खुल्या प्रवर्गासाठी असल्याने कोणत्याही प्रवर्गातील व्यक्ती या पदावर दावा करु शकतो. त्याच प्रमाणे महिलाही या पदावर दावा करु शकतात. त्यामुळेच सत्ता कोणत्याही पक्षाची येवो, महापौरपदाच्या इच्छुकांची संख्या मात्र अधिक राहणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...