आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरतच्या प्रेमीयुगुलासह अन्य एका जोडप्याला युवकांनी बदडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - संशयितपणे एका मोबाइलच्या दुकानावर उभे असलेल्या युवक आणि युवतीला काही जणांनी विचारपूस केली. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे जमावाने युवकाला चांगलाच चोप दिला. ते दोघेही सुरत येथील आहेत. मुलींच्या आईवडिलांना फोनवरून माहिती दिली. तसेच दुसरे प्रेमीयुगुलसुद्धा रिगल टॉकिजजवळ दिसून आल्याने पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले. याप्रकरणी शनिवारी रात्री उशिरापर्यंत तक्रार देण्याची प्रक्रिया सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात सुरू होती.

सुरत येथील २० वर्षीय युवक आणि १९ वर्षीय युवती घरून पळून आले. ते अकोल्यात थांबले. त्यांना मोबाइल घ्यायचा असल्यामुळे ते खोलेश्वर येथील एका मोबाइल शॉपीसमोर थांबले. मात्र, त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे काही स्वयंसेवी युवकांनी त्यांची विचारपूस केली. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर ते दोघेही घरून पळून येऊन लग्न करण्याच्या इराद्याने आल्याचे समजले. त्यांच्याजवळ कागदपत्रे आणि २५ हजार रुपये होते. विशेष म्हणजे, दोघेही भिन्न धर्मीय असल्यामुळे उपस्थितांनी त्या युवकाला चांगलेच बदडले. त्यानंतर पोलिसात प्रकरण गेले. पोलिसांनीही त्यांची चौकशी केली असता ते लग्न करण्यासाठीच अकोल्यात आल्याचे समजले.
पोलिसांनी मुलीच्या आईवडिलांना कळवले असून, या मुलीचे आईवडील रविवारी अकोल्यात येणार आहेत, तर याचदरम्यान रात्री वाजता रिगल टॉकिजसमोर रिधोरा येथील युवक आणि भौरद येथील एक युवती दोघेही संशयास्पद स्थितीत आढळल्याने त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या युवकालाही जमावाने चांगलाच चोप दिला. या युवकाची आणि युवतीची ओळख युवतीच्या बहिणीच्याच माध्यमातून झाल्याची कबुली युवतीने दिली. त्यानंतर युवतीला तिच्या घरी पाठवून देण्यात आले. हा युवक तहसील कार्यालयासमोरील एका सेतू केंद्रात काम करतो. विशेष म्हणजे, दोन्ही जोडपे सज्ञान आणि भिन्न धर्मीय असल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

कार्य तत्परतेमुळे निवळला तणाव
संशयित रित्याउभे असलेली दोन जोडपे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आल्याने युवकांनी त्यांना चांगलाचा चोप दिला. हे जोडपे भिन्न धर्मीय असल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी कार्यतत्परता दाखवत कारवाई करून प्रकरण व्यवस्थितपणे हाताळल्याने तणाव निवळला.
बातम्या आणखी आहेत...