आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लव्ह जिहादचा संशय; युवकाला बेदम बदडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍मक छायाचित्र - Divya Marathi
प्रतिकात्‍मक छायाचित्र
अकोला- जठारपेठेती लविठ्ठल हॉस्पिटलसमोर एक युवक एका अल्पवयीन युवतीशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. काही धार्मिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी त्या युवकाला विचारपूस केली असता, सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे येथील नागरिकांनी त्याला चांगलाच प्रसाद दिला. प्रकरण रामदासपेठ पोलिस ठाण्यात पोहोचले होते. मात्र, तक्रार केल्यामुळे पोलिसांनी या युवकावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.
विठ्ठल हॉस्पिटलसमोर १६ वर्षीय युवतीसोबत दुचाकी बाजूला उभी करून एक युवक बोलत उभा होता. तो तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करतोय, असे काहींना दिसून आले. या युवकाच्या शेजारीच त्याचा मित्र उभा होता. तो पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे.
संशयावरून त्या युवकाला चांगलेच बदडले. मात्र, त्याचा मित्र पळून जाण्यात यशस्वी झाला. जमावाने या युवकाला आणि मुलीला पोलिस ठाण्यात आणले. या वेळी मुलीचे आईवडीलही पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. मात्र, आम्हाला युवकाविरुद्ध तक्रार द्यायची नसल्याची भूमिका त्यांनी घेतल्यामुळे याप्रकरणी युवकाविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली. मुलीचे वडील आपल्या ओळखीचे असल्यामुळे आपण त्या मुलीशी बोललो, असे त्याचे म्हणणे आहे.