आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाआरोग्य अभियानातील एक हजार शस्त्रक्रिया बाकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महाआरोग्य अभियानात तपासणी होऊन शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या १,४४४ पैकी केवळ ४०० शस्त्रक्रिया झाल्या आहेत. आणखी हजार शस्त्रक्रिया बाकी राहिल्याने महाआरोग्य अभियानाच्या यशस्वितेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गंभीर रुग्णांचा फॉलोअप घेण्यात प्रशासनाने माघार घेतल्याने प्रशासनच रुग्णांच्या जीवावर उठल्याचे दिसून येते.
जिल्हा प्रशासनातर्फे महाआरोग्य शिबिराचे आयोजन मार्च रोजी केले होते. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी स्वत: पुढाकार घेऊन हे शिबिर घेतले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यावर शिबिराची जबाबदारी सोपवली होती. शहरातील नामांकित डॉक्टर्स आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा आम्ही शस्त्रक्रियेसाठी पुढाकार घेऊ, असे आश्वासन पालकमंत्र्यांना दिले होते. मेडिसीन, सर्जरी, स्त्रीरोग, अस्थिरोग, बालरोग, त्वचारोग, नेत्ररोग, कान, नाक, घसा विभाग, कर्करोग, दंतरोग, मनोविकृती आदी आजारांच्या ८,५२७ पुरुष ७,८३१ महिलांची तपासणी करण्यात आली होती. यांपैकी १,४४४ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी संदर्भित करण्यात आले होते. महाआरोग्य अभियान दोन दिवस राबवून भाजप नेत्यांनी अधिकाऱ्यांनी आपला उदोउदो तर करून घेतला, पण गरजू गरीब रुग्णांना पुढील उपचाराची सुविधा देण्याचा विसर पडला. त्यामुळेच तीन महिन्यांतच केवळ ४०० रुग्णांवर शस्त्रक्रिया होऊ शकल्या. आज रोजी १,०४४ रुग्ण शस्त्रक्रियेपासून वंचित आहेत. तीन महिन्यांच्या कालावधीत या रुग्णांवर शस्त्रक्रिया तर झालीच नाही, शिवाय त्यांच्याकडे ढुंकूनही प्रशासनाने पाहिले नाही. आशेवर असलेल्या रुग्णांची मात्र प्रकृती बिघडत चालली आहे. त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

येथे होणार होत्या शस्त्रक्रिया
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, संत तुकाराम कॅन्सर हॉस्पिटल, आयकॉन हॉस्पिटल, जिल्हा स्त्री रुग्णालय, ओझोन हॉस्पिटल, सिटी हॉस्पिटल, सहारा हॉस्पिटल, आधार हॉस्पिटल, शुक्ल चिल्ड्रेन हॉस्पिटल, विठ्ठल हॉस्पिटल, मुरारका हॉस्पिटल, विदर्भ हॉस्पिटल, जोशी रुग्णालय, माउली हॉस्पिटल या रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्या जातील, असे रुग्णांना सांगण्यात आले होते.

रुग्णांनी पुढे यायला हवे
^डॉक्टरांचे सहकार्य मिळाले. शस्त्रक्रियेसाठी रुग्णांनी पुढाकार घेतला नाही. मेमध्ये उन्हामुळे बरेच रुग्ण आले नाहीत. बाह्यरुग्ण विभागात मदत कक्ष कार्यान्वित केला. रुग्णांनी येथे भेटून शस्त्रक्रियेसाठी पुढे यावे.'' डॉ. अनंत डवंगे, अधीक्षक

विभाग नियोजित झालेल्या
दंतशास्त्र २९८ १७८
सर्जरी ४६१ १५४
नेत्ररोग ४६३ २७
ईएनटी १०१ १४
स्त्रीरोग ६० १८
युरोलॉजी१४ ०१
बायपास १५ ००
अस्थिरोग ३२ ०८
एकूण १४४४ ४००
दृष्टिक्षेपात शस्त्रक्रिया

बातम्या आणखी आहेत...