आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री 7 ला अकोल्यामध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्ह्यातील काही लोकाभिमुख इमारतींचे भूमीपूजन आणि घरकुलांच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगामी शुक्रवार, ऑक्टोबर रोजी अकोल्यात येण्याची शक्यता आहे. या संभाव्य दौऱ्याबाबत पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज सकाळी आढावा बैठक घेतली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत दीडशे कोटी रुपये खर्चून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परीसरात उभारले जाणारे अत्याधुनिक सुपर स्पेशालीटी हॉस्पीटल अकोल्याच्या नवीनतम तहसिल कार्यालयाचा आढावा घेण्यात आला. या दोन्ही प्रस्तावीत इमारतींचे भूमिपुजन मुख्यमंत्री महोदय करणार आहेत. याशिवाय अकोट तहसिल कार्यालयाच्या प्रस्तावीत इमारतीचे भुमिपुजन आणि इंदिरा आवास योजनेअंतर्गत मुर्तिजापूर बाळापूर येथे बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पणही त्यांच्याहस्ते केले जाण्याची शक्यता आहे. यावेळी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, उपविभागीय अधिकारी ओमप्रकाश अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्यादृष्टीने संबंधित सर्व विभागांनी तयारी करावी अशा सूचना यावेळी पालकमंत्री यांनी दिल्यात.

कलेक्टरांचेे टिप्पणी तयारीचे आदेश
यावेळी जिल्हयातील महत्वाच्या प्रश्नांसह विकास कामांचाही आढावा घेण्यात आला. विविध विषयांवर चर्चा करण्यात अाली. त्यामुळे जिल्हयातील सर्व विभागप्रमुखांनी मुख्यमंत्री यांच्या संभाव्य दौराच्या संदर्भात त्या-त्या कार्यालयांशी निगडित कामांची टिप्पणी सोबत ठेवावी अशा सूचना जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...