आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडा, विदर्भासाठी खजिना उघडला, चाराटंचाई पुढील तीन महिने भासणार नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या मराठवाडा, विदर्भाला यापुढे निधीची कधीच कमतरता पडणार नाही. मागेल तेवढे मागा, नियोजन करा आणि लोकसहभागातून विकास करा, अशी ग्वाहीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली. अकोला येथील जाहीर सभेत ते बोलत होते. शहर व जिल्ह्याच्या ३२५ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन त्यांनी केले.
फडणवीस म्हणाले, पाच वर्षांत जेवढ्या वीजजोडण्या काँग्रेस सरकारने दिल्या नव्हत्या, त्यापेक्षा दुप्पट अाम्ही एका वर्षात दिल्या आहेत. त्यासाठीही निधीची कमतरता पडणार नाही. पाणी, वीज व बाजारपेठ या तिन्ही गोष्टींवर सरकार गांभीर्याने विचार करत आहे. ‘जलयुक्त शिवार' ही योजना लोकचळवळ बनली अाहे. ३०० कोटी रुपये या योजनेच्या माध्यमातून लोकांनी खर्च केले आहेत. कौशल्यातून रोजगारनिर्मिती होत असते. हा उद्देश समाेर ठेवून कौशल्य विकास धोरण आखले आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय कंपनीसोबत करार केला अाहे. ज्या ठिकाणी कापूस होतो. तेथे इंटिग्रेटेड टेक्स्टाइल पार्कची निर्मिती केली जात आहे. रेमंडसोबत करार केला आहे. १५ हजार तरुणांना या माध्यमातून रोजगार मिळषल. कौशल्य विकासच्या माध्यमातून तीन लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी बॉश कंपनीसोबत करार केला आहे. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व रोजगार देण्याची तजवीजही करण्यात आली आहे, असेही फडणवीस म्हणाले.
पुढील स्लाइडमध्ये,
>> अात्महत्याही दाखवा पंतप्रधानांना : मुंडे
>> चाराटंचाई पुढील तीन महिने भासणार नाही