आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१० रुपयांपेक्षा जास्त रक्कम आल्यास दंड, महामंडळाच्या निर्णयाने नाराजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आता एसटी बसेसच्या तिकीट देण्याच्या मशीनमध्ये बदल केला आहे. पूर्वी तिकिटांचा हिशेब ही मशीन ठेवत होती. आता तो हिशेबच या मशीनमध्ये वाहकांना दिसणार नाही. जेव्हा तिकिटांची सर्व रक्कम अधिकाऱ्यांच्या सुपूर्द करण्यात येईल, तेव्हा १० रुपयांपेक्षा अधिक असलेल्या रक्कमेला रुपयांसाठी १०० रुपये, तर कमी असल्यास ५० पट दंड वाहकांना भरावा लागणार आहे. या निर्णयामुळे वाहकांमध्ये तीव्र नाराजी असून, आता काम कसे करायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.
राज्य परिवहन विभागात दिवसेंदिवस होत असलेले बदल आणि निर्णय हे कर्मचाऱ्यांच्या विरोधात आहेत, अशी धारणा सध्या एसटीच्या हजारो कर्मचाऱ्यांमध्ये आहे. लवकरच वाहकाजवळ असलेल्या तिकीट मशीनमधील हिशेबाचे ऑप्शन काढून टाकण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व तिकीटांचा एक रकमी रक्कम वाहकांला दिसत होती. ती आता दिसणार नाही. तर ती रक्कम केवळ तपासणी अधिकाऱ्यांनाच दिसणार आहे. प्रशासनाने केलेल्या या बदलामागे नेमका हेतू काय, असा सवाल वाहक उपस्थित करत आहेत.

हिशेब जमा केल्यावर समजेल वाहकास रक्कम : सदररक्कममध्ये १० रुपयांपर्यंत कमी-जास्त असल्यास वाहकाला मोकळीक दिली जाणार आहे. त्यापुढील जास्त रकमेस १०० च्या पटीने दंड वसुली केली जाणार आहे. तर त्यापुढील कमी रक्कमेस ५० च्या पटीने दंड वसुली केली जाणार आहे. संपूर्ण हिशेब भरतेवेळी रक्कम जमा केल्यावर वाहकाला एसटीची रक्कम रक्कम समजणार आहे.

प्रवाशांचे असे होईल नुकसान : प्रवाशांजवळतिकिटाचे मोजके पैसे नसले तर अशा प्रवाशांना वाहक प्रवास नाकारतील. त्यावरून प्रवासी आणि वाहक यांच्यात भांडणे होतील. त्याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर होऊ शकतो.

काय म्हणतात वाहक
बहुतांश वेळा प्रवासी तिकिटाचे मोजके पैसे देत नाहीत. अशावेळी कमी जास्त रक्कम असल्यास तिकिटाच्या मागच्या बाजूला आम्ही लिहून देतो. काहीवेळी प्रवाशाला आठवण राहत नाही. त्यामुळे ती रक्कम आमच्याकडे शिल्लक दिसू शकते. आम्ही तपासणी अधिकाऱ्याकडे रक्कम जमा करतेवेळी एकूण तिकिटाचा हिशोब लावतो आणि एकरकमी रक्कम जमा करतो. आता जर कमी जास्त रक्कम दिसून आली, तर त्यासाठी आम्हाला दंड सोसावा लागणार आहे. अनेकवेळा जर अशा दंडाच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागले तर नोकरी सोडण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
बातम्या आणखी आहेत...