आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट पासपोर्ट बनवणारी टोळी शहरात सक्रिय, एकाला अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवणारी टोळी सक्रिय असल्याचे शुक्रवारी समोर आले आहे. पोलिसांनी उत्तर प्रदेशातील एका युवकाला याप्रकरणी अटक केली असून, त्याच्या इतर साथीदारांचा शोध पोलिस घेत आहेत.

उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यातील फत्तेपूर बंगई येथील एका युवकाने परदेशात जाण्यासाठी बनावट पासपोर्ट काढला आहे. त्याने अकोल्यात आपला जन्म झाल्याचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र महापालिकेतून मिळवले. त्याआधारे त्याने पासपोर्टसाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करून पासपोर्ट काढला. ही माहिती दहशतवादविरोधी कक्षाला मिळाली. त्यांनी या प्रकरणाचा तपास केला असता त्यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट काढल्याचे आढळून आले. त्यावरून दहशतवादविरोधी कक्षाच्या पोलिसांनी युवकाविरुद्ध जुने शहर पोलिस ठाण्यात भादंवि ४२०, ४६८, ४७१ सहकलम भारतीय पारपत्र अधिनियम १९६७ चे कलम १२ (१) (क) (ख) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोनदिवसांपासून अटक; सोबत्यांचा पत्ता नाही
उत्तरप्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यातील युवकाला बनावट पासपोर्टसहित पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अटक केली. मात्र, त्याला या प्रकरणात कोण कोण सोबती आहेत. त्यापर्यंत पोलिसांना पोहोचता आले नाही. हा युवक सध्या पोलिस कोठडीत आहे. त्याच्याकडून काय माहिती मिळते, याकडे पोलिसांचे लक्ष आहे.

शोध सुरू
दहशतवादविरोधीकक्षाने प्रकरणाचा तपास केला. त्यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट काढल्याचे आढळले. त्यांनी इतर आरोपींचा शोध सुरू केला.

जन्म प्रमाणपत्र देणारे मोकाटच
अकोल्यातचजन्म झालेला असेल, तर त्याला प्रमाणपत्र काढण्यासाठी अनेक चकरा माराव्या लागतात. मात्र, उत्तर प्रदेशातील युवकाला महापालिका प्रशासनाने जन्माचा दाखला कसा दिला. याप्रकरणी पोलिसांनी दाखला देणा-यापर्यंत पोहोचणे आवश्यक होते. मात्र, त्याच्यावर आणि इतर कागदपत्रे देणा-यांवर अजून काहीही कारवाई केली नाही.
बातम्या आणखी आहेत...