आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..अन् अचानक लाइट आली, क्षणात गेला मजूराचा जीव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानोरा (वाशिम)- तालुक्‍यातील गव्हा येथे एका मजूराचा विजेचा धक्‍का लागून मृत्‍यू झाला आहे. गणेश शामराव पवार असे या 32 वर्षीय युवकाचे नाव आहे. तो शेतातील वीज पुरवठा सुरळीत करण्‍यासाठी विजेच्या खांबावर चढला होता. दरम्‍यान, अचानक लाइट आल्‍याने ही घटना घडली.
- गणेश शामराव पवार असे विजेच्या धक्‍क्याने मृत्‍यू झालेल्‍या युवकाने नाव आहे.
- गावातील एका शेतातील वीज पुरवठा सुरळीत करण्‍यासाठी गणेश गेले होते.
- गणेश हे शेतमजूर आहेत. शिवाय ते लाइनमनसाठीही मजूरीचे काम करत होते.
- वीज खंडीत असताना गणेश खांबावर चढले. अचानक लाइट आल्‍याने त्‍यांना धक्‍का बसला.
.. तर जीव वाचला असता
गणेश यांना विजेचा जोरदार धक्‍का बसल्‍यावर ते फेकल्‍या गेले. मात्र, सोबत असलेल्‍या आसनाच्‍या पाटलीमध्‍ये त्‍यांचे पाय अडकले. त्‍यामुळे ते जमिनीवर पडले नाही. ते खाली पडले असते तर, त्‍यांना वाचवण्‍यात यश आले असते अशी चर्चा ग्रामस्‍थांमध्‍ये सुरू आहे.
विश्‍लेषण- महावितरणने ठरवून दिलेल्‍या परिसरात लाइनमन स्‍वत: काम न करता ते गावातील मजूराकडून काम करुन घेतात. ग्रामीण भागात सर्रासपणे हा प्रकार पाहायला मिळतो. लाइनमन अलिकडे खांबावर चढत नाहीत. त्‍यांच्‍या या नेहमीच्‍या कामासाठी ते गावातील खाजगी मजूर नेमतात. किरकोळ कामासाठी लाइनमन गावातही येत नाहीत, नेमलेला मजूराला फोन करुन ते काम करुन घेतात. गणेश हा याच गैरप्रकाराचा बळी ठरला आहे.

पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, असा झाला अपघात..
बातम्या आणखी आहेत...