आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'ते’ असे प्रेत ज्याला स्मशानही न वाली, गाडलेला मृतदेह काढण्‍याची ग्रामस्‍थांची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गटविकास अधिकारी यांना निवेदन देताना ग्रामस्‍थ. - Divya Marathi
गटविकास अधिकारी यांना निवेदन देताना ग्रामस्‍थ.
मानोरा (वाशीम) – ऐन उमेदीच्या काळात त्याला कर्करोग झाला. घरची परिस्थिती बेताचीच. पण, जगण्याच्या इच्छे‍ने त्यानं दूरदूरपर्यंत जाऊन उपचार घेतले. असह्य वेदना सहन केल्या‍त. दरम्यान, कर्करोगाविषयी असलेल्या गैरसमजामुळे ग्रामस्थांनी त्याला महारोगी ठरवत जवळ जाणे टाळले. जिवंतपणी नरकयातना भोगून 3 जुलैला त्याचा मृत्यू झाला. गावालगतच त्याला विधीवत दफन करण्यात आले. पण, त्या‍च्या प्रेतामुळेही गावात कर्करोग होऊ शकतो या भीतीने ग्रामस्थांनी तहसीदार, पोलिस निरीक्षक यांच्याककडे निवेदन देऊन पुरलेले प्रेत काढून इतर ठिकाणी दफण करण्याची मागणी केली. ही व्यथा आहे तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील अरविंद देवीसिंग चव्हाण यांची.
नेकमे काय आहे प्रकरण

ग्रामस्थांनी चव्हाण यांच्या कुटुंबावर आरोप केला की, अरविंद यांचा मृतदेह स्मशानभूमीत न पुरता गावालगतच्या विहिरीजवळ दफण केला.या विहिरीतीलच पाणी ग्रामस्थ पितात. पण, कर्करोग असलेल्‍या चव्हाण यांच्या मृतदेहामुळे हे पाणी दूषित झाले असून, गावात इतरांनाही कर्करोग होऊ शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यामुळे या ठिकाणीचा मृतदेह बाहेर काढावा आणि तो गावाबाहेर दूर दफण करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि पोलिस निरीक्षक यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे. या बाबत मानोरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक के. बी. वाघमारे म्हणाले, ‘‘ हा प्रकार गंभीर आहे. अंत्यसंस्कार हे स्मशानभूमीजवळच करायला हवेत. जर कुणी रीतसर तक्रार केली तर आपण कारवाई करू’’, असे ते म्हणाले.