आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनवाणी यांच्या मर्डरसाठी दिली ८० हजारांची सुपारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - व्यापारी महेश रामचंद्र मनवाणी (वय ४४) यांचा पैशांच्या देवाण-घेवाणीतून त्यांच्याच मित्रांनी गळा कापून खून केला. त्यासाठी ८० हजार रुपयांची सुपारी देण्यात आली होती. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री उशिरा सिंधी कॅम्पमधील दक्षता संकुलाच्या मागे घडली होती. याप्रकरणी खदान पोलिसांनी पाच तासांच्या आतच खून करणाऱ्या तिघांना अटक केली. आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे.

महेश मनवाणी यांचा ऑटो भाड्याने चालवायला देण्याचा व्यापार करत होता. तसेच ते व्याजानेही पैसे द्यायचे. त्यांचा मित्र शैलेश ओमप्रकाश दारा याला त्यांनी ८० हजार रुपये दिले हाेते. पैसे देऊन बरेच दिवस लोटल्यामुळे व्याजासह रकमेचे लाख ४० हजार रुपये झाले होते. अनेक दिवसांपासून महेश शैलेशला पैसे मागत होते. मात्र, पैसे देण्याची नियत बदलल्यामुळे शैलेशच्या डोक्यात महेशला संपवण्याचा कुविचार आला. लाख ४० हजार दिल्यापेक्षा ८० हजारात महेशची सुपारी देणे त्याला सहज शक्य वाटले. या विचारातून त्याचे दोन मित्र शैलेंद्र राजाराम दडवी (वय २२) अंकुश गणपतराव पाटील (२०) रा. सिंधी कॅम्प यांना प्रत्येकी ४० हजारप्रमाणे ८० हजारांची सुपारी दिली. शुक्रवारी रात्री शैलेश, शैलेंद्र आणि अंकुश यांनी प्लॅन रचला. शैलेश आणि महेश बिअरची बॉटल घेऊन दक्षता संकुलच्या पाठीमागे पोहोचले. या वेळी शैलेशने शैलेंद्र आणि अंकुशला इशारा केला. त्यानुसार दोघेही तेथे पोहोचले. शैलेश आणि महेश दारू पित असताना त्यांच्या पाठीमागून येऊन दोघांनीही महेश यांच्या डोक्यावर फरशीपासून बनवलेल्या कुऱ्हाडीने एकापाठोपाठ तीन वार केले. त्यात जागीच महेशचा मृत्यू झाला. त्यानंतर तिघेही घटनास्थळावरून पळून गेले. रात्री उशिरा ठाणेदार इंगळे यांच्या ताफ्याने घटनास्थळावर मिळालेल्या पुराव्यावरून आरोपींना अटक केली आहे. तसेच फरसा दुचाकीही जप्त केली.
आरोपी शैलेश हत्येनंतर करत होता जासुशी
हत्याकेल्यानंतर आरोपी शैलेश दारा हा गर्दी असलेल्या गल्लीमध्ये घटनेची माहिती घेत होता. मात्र, त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे ठाणेदार सी. टी. इंगळे यांनी त्याला पकडले आणि जमावातून बाहेर काढले. पोलिसी खाक्या दाखवताच आपले बिंग फुटल्याची भनक त्याला आल्याने त्याने आणखी दोघांची नावे सांगितली. पोलिसांनी दोघांनाही घरून अटक केली.
मात्र, तिसऱ्या दिवशी त्यांनी दक्षता संकुलच्या पाठीमागील जागा निवडली. त्यानुसार शैलेशच्या गाडीवर बसून महेश हे दक्षता संकुलच्या पाठीमागे आले होते. त्यानंतर शैलेंद्र अंकुश हे दोघे एमएच ३० झेड २६५ क्रमांकाच्या दुचाकीने आले. त्यानंतर शैलेश याने ठरल्याप्रमाणे या दोघांच्या दिशेने बॅटरीचा उजेड लावून सिग्नल दिला आणि शैलेंद्र याने महेशच्या डोक्यावर फरशाचे वार केले. त्यानंतर त्याचा सोबती अंकुश यानेसुद्धा गळ्यावर वार केले.
आरोपींना ऑक्टोबरपर्यंत कोठडी
आरोपी शैलेश ओमप्रकाश दारा, शैलेंद्र राजाराम दडवी अंकुश गणपतराव पाटील या तिघांना शनिवारी दुपारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी जय सिंघानिया यांच्या न्यायालयात हजर केले. आगामी तीन दिवस बंदोबस्त असल्याने पोलिसांनी आरोपींची पोलिस कोठडी वाढवून देण्याची विनंती केली. त्याचा विचार करून न्यायालयाने ऑक्टोबरपर्यंत आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी केली. आरोपींच्या वतीने अॅड. केशव एच. गिरी अॅड. वैशाली गिरी भारती यांनी, तर सरकारपक्षातर्फे अॅड. ए. के. अनोकार यांनी काम पाहिले.

उधारित घेतली होती सुपारी : महेशयांना संपवण्यासाठी शैलेंद्र दडवी आणि अंकुश पाटील या दोघांना उधारित सुपारी दिली होती. जसजसे पैसे येतील तसतसे तुम्हाला देईल, या अटीवर आरोपींनी सुपारी घेतली होती.